CoronaUpdate : जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रूग्‍णांची संख्या ६ हजारांच्‍या आत; दोन दिवसांत ३१४ ने घट 

अरुण मलाणी
Monday, 26 October 2020

सोमवारी (ता.२६) जिल्‍हा रूग्‍णालयातर्फे दोन दिवसांची एकत्रित माहिती जारी केली आहे. त्‍यानुसार या कालावधीत नाशिक शहरात ३१५, नाशिक ग्रामीणला २३७, मालेगावला ११ तर जिल्‍हा रूग्‍णालयात दोन कोरोना बाधित आढळून आले.

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या घटत असतांना, बऱ्या होणाऱ्या रूग्‍णांच्‍या वाढत्‍या संख्येमुळे जिल्‍ह्‍यातील ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्या सहा हजारांच्‍या आत आलेली आहे. गेल्‍या दोन दिवसांत जिल्‍ह्‍यात ५६५ बाधित आढळून आले असून, ८७३ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. सहा रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत ३१४ ने घट झाली असून सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात ५ हजार ६९२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

काल (ता.२५) विजया दशमीनिमित्त शासकीय सुट्टी असल्‍याने सोमवारी (ता.२६) जिल्‍हा रूग्‍णालयातर्फे दोन दिवसांची एकत्रित माहिती जारी केली आहे. त्‍यानुसार या कालावधीत नाशिक शहरात ३१५, नाशिक ग्रामीणला २३७, मालेगावला ११ तर जिल्‍हा रूग्‍णालयात दोन कोरोना बाधित आढळून आले. तर कोरोनामुक्‍त रूग्‍णांध्ये नाशिक शहरातील ६४६, नाशिक ग्रामीणचे १५१, मालेगावचे ५३ तर जिल्‍हाबाह्य २३ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. पाच मृतांमध्ये नाशिक शहरातील चार, नाशिक ग्रामीणचा एक तर जिल्‍हाबाह्य एका रूग्‍णाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९२ हजार २५६ झाली असून, यापैकी ८४ हजार ९२१ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ६४३ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

दोन दिवसांत नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ३९६, नाशिक ग्रमीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ६५, मालेगाव महापालिका हद्दीतील रूग्‍णालये १२, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात तर जिल्‍हा रूग्‍णालयात दोन रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ६२३ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते, यापैकी ३७६ रूग्‍ण नाशिक ग्रामीण भागातील आहेत. 

हेही वाचा > पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of active patients in the district is within 6,000 nashik marathi news