corona updates : ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत जिल्ह्यात ११२ ने वाढ; सलग पाचव्‍या दिवशी एक हजारांहून रुग्णसंख्या कमी  

अरुण मलाणी
Thursday, 8 October 2020

 जिल्ह्यात दिवसभरात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या सलग पाचव्‍या दिवशी एक हजारांहून कमी राहिली. बुधवारी (ता. ७) दिवसभरात ९४३ नवीन रुग्ण आढळले, तर ८१८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली

नाशिक : जिल्ह्यात दिवसभरात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या सलग पाचव्‍या दिवशी एक हजारांहून कमी राहिली. बुधवारी (ता. ७) दिवसभरात ९४३ नवीन रुग्ण आढळले, तर ८१८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तेरा रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ११२ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत नऊ हजार २८९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

दिवसभरात ९४३ बाधित; ८१८ कोरोनामुक्‍त, तेरा मृत्‍यू 
बुधवारी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ४७८, नाशिक ग्रामीणचे ४३७, मालेगावचे २२ तर, जिल्‍हाबाह्य सहा रुग्‍णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील ४१७, नाशिक ग्रामीणचे ३७९, मालेगावचे नऊ, तर जिल्‍हाबाह्य तेरा रुग्ण आहेत. तर दिवसभरातील १३ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील पाच, नाशिक ग्रामीणचे चार, मालेगाव महापालिका हद्दीत दोन, तर जिल्‍हाबाह्य दोघा रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजार ८३८ वर पोचली असून, यापैकी ७२ हजार ७३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ४७६ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

एक हजार २६७ अहवालांचा समावेश
दरम्‍यान, दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ९४०, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २१९, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १५, जिल्‍हा रुग्‍णालयात पाच संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ८३९ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणचे एक हजार २६७ अहवालांचा समावेश आहे.  

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of active patients increased by 112 in nashik district marathi news

टॉपिकस