जिल्ह्यात ८८ दिवसानंतर कोरोना बाधित तीनशेच्‍या आत; बरे झाले ६२८ रूग्‍ण, पाच मृत्‍यू 

अरुण मलाणी
Sunday, 25 October 2020

शनिवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १७६, नाशिक ग्रामीणचे ८२, मालेगावचे दहा तर जिल्‍हाबाह्य दोन बाधित आढळून आले.

नाशिक : गेल्‍या काही कालावधीत नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत घट झाली आहे. शनिवारी (ता.२४) तब्‍बल ८८ दिवसानंतर नव्‍याने आढळणाऱ्या दिवसभरातील कोरोना बाधितांची संख्या तीनशेच्‍या आत राहिली. जिल्ह्या‍त २७० नवीन कोरोना बाधित आढळले , ६२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून पाच रुग्णांचा मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत ३६३ ने घट झाली आहे. सध्या जिल्ह्या‍त सहा हजार सहा बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

शनिवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १७६, नाशिक ग्रामीणचे ८२, मालेगावचे दहा तर जिल्‍हाबाह्य दोन बाधित आढळून आले. तर कोरोनामुक्‍तांमध्ये नाशिक शहरातील २७८, नाशिक ग्रामीणचे ३३२, मालेगावचे तेरा तर जिल्‍हाबाह्य पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पाच मृतांमध्ये नाशिक शहरातील तीन, ग्रामीणच्‍या दोन रुग्णांचा समावेश आहे. यातून जिल्ह्या‍तील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९१ हजार ६९१ झाली असून, यापैकी ८४ हजार ०४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ६३७ रुग्णांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

दिवसभरात नाशिक महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात ६५८ रूग्‍ण, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात १८२, मालेगाव रुग्णालयांत आठ, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सहा तर जिल्‍हा रूग्‍णालयात पाच रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ९२६ अहवाल प्रलंबित होते. यापैकी ६७८ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत.

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona infected patients in the district is within three hundred nashik marathi news