Coronaupdate : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १४ हजार ४५९ वर...तर 'इतक्या' रुग्णांची कोरोनावर मात

अरुण मलाणी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

नाशिक शहरात आतापर्यंत नऊ हजार ४११ कोरोनाबाधित आढळले असून, त्‍यांपैकी सात हजार ३०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये तीन हजार ५३६ रुग्ण आढळले असून, दोन हजार ५५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : शहर-परिसरासह जिल्ह्यात पुन्‍हा एकदा नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी (ता. ३१) दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांच्‍या संख्येने सहाशेचा आकडा ओलांडला. ६६८ रुग्णांची भर पडली असून, दिवसभरात ४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  

दिवसभरात जिल्ह्यात नवीन ६६८ कोरोनाबाधित

शुक्रवारी दिवसभरात आढळलेल्‍या नवीन ६६८ कोरोनाबाधितांपैकी नाशिक शहरातील तब्‍बल ५४२ रुग्ण असून, नाशिक ग्रामीणचे ७१, मालेगावचे नऊ, तर जिल्‍हाबाह्य तीन रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या ४१० रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ३२१, नाशिक ग्रामीणचे ८०, मालेगावच्‍या नऊ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील हिरावाडी येथील ६६ वर्षीय पुरुषाचा, तर नाशिक ग्रामीण भागात इगतपुरी येथील ५७ वर्षीय पुरुष, भगूरच्‍या ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्‍या ४९९ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील २७६, नाशिक ग्रामीणचे ११८, मालेगाव महापालिका हद्दीतील ८५, तर अन्‍य जिल्ह्या‍तील २० रुग्णांचा समावेश आहे. 

११ हजार १२७ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांचा आकडा १४ हजार ४५९ झाला असून, मृतांचा आकडा ४९९ झाला आहे. ११ हजार १२७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. नाशिक शहरात आतापर्यंत नऊ हजार ४११ कोरोनाबाधित आढळले असून, त्‍यांपैकी सात हजार ३०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये तीन हजार ५३६ रुग्ण आढळले असून, दोन हजार ५५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगाव महापालिका हद्दीत एक हजार ३०७ कोरोनाबाधित आढळले असून, एक हजार १२९ रुग्ण बरे झालेले आहेत. 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

प्रलंबित अहवालांची संख्या पुन्‍हा हजारात 

शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी उशिरापर्यंत प्रलंबित अहवालांची संख्या एक हजार ४८ होती. काही दिवसांपूर्वीपर्यंत प्रलंबित अहवालांची संख्या घटली असताना आता पुन्‍हा एकदा प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. दरम्‍यान, दिवसभरात ९६७ संशयित रुग्णालयात दाखल झाले असून, यांपैकी ७३४ रुग्ण नाशिक शहरातील आहेत. १०१ रुग्ण नाशिक ग्रामीणचे, ३० मालेगावचे, तर १०२ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients found in the district has risen to 14,459 and the death toll has risen to 499 nashik marathi news