दिवसभरातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्‍हा पाचशेच्‍या आत; तर ४०१ रुग्‍ण कोरोनामुक्त

अरुण मलाणी
Sunday, 18 October 2020

जिल्ह्यातील महापालिका हद्द वगळता अन्‍य विविध तालुक्‍यांचा समावेश असलेल्‍या नाशिक ग्रामीण क्षेत्रातील रुग्‍ण संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत या भागांतून २५ हजार ८६ रुग्‍ण आढळून आले असून, यापैकी २० हजार ९२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : कोरोना प्रादुर्भावाच्‍या दृष्टीने ऑक्‍टोबर महिना काहीसा दिलासादायक असून, पुन्‍हा एकदा दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या पाचशेपेक्षा कमी राहिली. शनिवारी (ता.१७) दिवसभरात नव्‍याने ४९१ बाधित आढळून आले. तर ४०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, १३ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ७७ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात सात हजार १४७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

दिवसभरात ४०१ रुग्‍णांची कोरोनावर मात, १३ मृत्‍यू 

शनिवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील २६९, नाशिक ग्रामीणचे १९९, मालेगावचे १२, तर जिल्‍हाबाह्य ११ बाधितांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २२५, नाशिक ग्रामीणचे १४४, मालेगावचे २५, तर जिल्‍हाबाह्य सात रुग्णांनी कोरोनावर मात केली. दिवसभरातील १३ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील तीन, नाशिक ग्रामीणच्‍या दहा रुग्‍णांचा समावेश आहे. यातून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८८ हजार ८६१ झाली असून, यापैकी ८० हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ५९१ रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालये व गृहविलगीकरणात ७२६, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात ५७, मालेगाव महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात सात, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दहा, तर जिल्‍हा रुग्‍णालयात तीन संशयित दाखल झाले आहेत. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

नाशिक ग्रामीणने ओलांडला २५ हजारांचा टप्पा 

जिल्ह्यातील महापालिका हद्द वगळता अन्‍य विविध तालुक्‍यांचा समावेश असलेल्‍या नाशिक ग्रामीण क्षेत्रातील रुग्‍ण संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत या भागांतून २५ हजार ८६ रुग्‍ण आढळून आले असून, यापैकी २० हजार ९२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ५५६ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. सध्या तीन हजार ६०१ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत.  

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona victims is once again within five hundred nashik marathi news