दिलासादायक! जिल्ह्यात 'इतक्या' कोरोनाबाधितांपैकी १२ हजार २८४ रुग्णांची कोरोनावर मात

अरुण मलाणी
Wednesday, 5 August 2020

एकीकडे जिल्ह्यातील रुग्‍णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना, दुसरीकडे प्रलंबित अहवालांच्‍या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत तब्‍बल एक हजार ४७२ अहवाल प्रलंबित होते. 

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना मंगळवारी (ता. ४) मात्र दिलासादायक चित्र बघायला मिळाले. दिवसभरात आढळलेल्‍या बाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक होती. जिल्ह्यात मंगळवारी ४७७ नवीन बाधित आढळल्‍याने एकूण रुग्णसंख्या आता १७ हजार १२६ झाली आहे. 

५०३ जणांची कोरोनावर मात

दिवसभरात ५०३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्याही १२ हजार २८४ झाली आहे. दरम्यान, बारा रुग्‍णांच्‍या मृत्‍यूमुळे मृतांची एकूण संख्या ५४५ झाली आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ३९५, ग्रामीण भागातील ९७, मालेगावचे नऊ, तर अन्य जिल्ह्यांतील दोन रुग्णांचा समावेश आहे. तसेच, नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ३४७, ग्रामीण भागातील ७२, मालेगावचे तीन आणि रात्री उशिरा प्राप्त झालेल्या ५५ अहवालांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात नाशिक शहरातील नऊ आणि ग्रामीण भागातील तीन, अशा एकूण बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

बारा जणांचा मृत्यू 

शहरातील गांधीनगर येथील ७१ वर्षीय, नवनाथनगरमधील ५३ वर्षीय, पाराशरेवाडा येथील ५३ वर्षीय, शिंगाडा तलाव येथील ५९ वर्षीय व ७० वर्षीय, सद्‌भावना चौकातील ६५ वर्षीय, अण्णा भाऊ साठेनगर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा, तसेच राणेनगर येथील ७३ वर्षीय महिला, नाशिक रोडच्‍या चेहेडी पंपिंग स्‍टेशनजवळील २४ वर्षीय युवक यांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. तर, ग्रामीणमध्ये पिंपळगाव बसवंत येथील ५० वर्षीय महिला, येवल्‍यातील ५९ वर्षीय पुरुष, तर ठेंगोडा (ता. बागलाण) येथील ३१ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. 

हेही वाचा > जेव्हा साधु महाराजांच्या कुटियाच्या आवारातच घडतो धक्कादायक प्रकार...पोलीसांनी केला खुलासा

तब्‍बल चौदाशे अहवाल प्रलंबित 

दरम्यान, मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात ९६५ संशयित रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक शहरातील ६२०, ग्रामीण भागातील २२५, मालेगावमधील ३५, तर गृहविलगीकरणातील ८५ रुग्‍ण आहेत. एकीकडे जिल्ह्यातील रुग्‍णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना, दुसरीकडे प्रलंबित अहवालांच्‍या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत तब्‍बल एक हजार ४७२ अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा > धक्कादायक! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईंकाकडून रुग्णालयाची तोडफोड....काय घडले नेमके? सीसीटिव्हीतून उघड

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of healed in the district Is greater than the corona patients nashik marathi news