बिटको हॉस्पिटलची कोरोना रुग्णसंख्या निम्म्यावर; एप्रिलच्या तुलनेत प्रमाण घटले

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Monday, 5 October 2020

नाशिक रोडची रुग्णसंख्या निम्म्यावर आली आहे. आजपर्यंत बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या ७०० च्या आसपास असायची, मात्र सध्या येथे २९५ रुग्ण उपचार घेत असून, सरासरी आकडेवारी ५० टक्क्यांच्या आत आली आहे. 

नाशिक : (नाशिक रोड) येथील आरोग्य सेवेचे मुख्य केंद्र असणाऱ्या बिटको हॉस्पिटल व कोविड सेंटरमधील परिस्थिती आता अपेक्षेप्रमाणे नियंत्रणात आली आहे. बिटको हॉस्पिटलमधील रुग्णसंख्या एप्रिलच्या तुलनेत आता ५० टक्क्यांवर आल्याचे केंद्रप्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी सांगितले. 

सरासरी आकडेवारी ५० टक्क्यांच्या आत

बिटको हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये एप्रिलला रुग्णसंख्या मोठी होती. बेडअभावी अनेकांना जीव गमवावा लागला. नवीन इमारतीत कोविड सेंटर सुरू केल्यानंतर रुग्णांना गुणात्मक व दर्जात्मक सेवा मिळू लागली. सध्या एक हजार खाटा या ठिकाणी कोविडसाठी आरक्षित केल्या असून, लॉकडाउनच्या काळात नवीन खाटांत मोठ्या संख्येने भर पडली आहे. रुग्णालयाचा मृत्युदरही कमी आहे. नाशिक रोडची रुग्णसंख्या निम्म्यावर आली आहे. आजपर्यंत बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या ७०० च्या आसपास असायची, मात्र सध्या येथे २९५ रुग्ण उपचार घेत असून, सरासरी आकडेवारी ५० टक्क्यांच्या आत आली आहे. 

हेही वाचा >  एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

रुग्णसंख्या जवळपास निम्म्यावर आली आहे. सध्या २९५ रुग्ण उपचार घेत असून, नाशिक रोड परिसरातील नागरिक नियमांचे तंतोतंत पालन करत असल्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्यावर विजय मिळवता आला आहे. - डॉ. जितेंद्र धनेश्वर, वैद्यकीय अधिकारी, बिटको हॉस्पिटल 

लोकांचा आजाराविषयी असणारा गैरसमज दूर झाला असून, उपचाराला प्रतिसाद दिल्याने हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने जिवावर उदार होऊन लोकांची सेवा केल्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्याकडे वाटचाल सुरू आहे. - जगदीश पवार (नगरसेवक)  

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of patients at Bitco Hospital has halved nashik marathi news