Coronaupdate : जिल्ह्यात 24 तासांत 'रेकॉर्ड ब्रेक' नवे रुग्ण; मृतांचा आकडा ८१३ वर

अरुण मलाणी
Thursday, 27 August 2020

नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ३३, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २६८, मालेगाव रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २३, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये १७, जिल्‍हा रुग्‍णालयात सहा संशयितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (ता. २६) ९९१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजार ४९ झाली आहे. तर, दिवसभरात ७०८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या २६ हजार ४९ झाली आहे. दिवसभरात ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्या संख्येत २८३ ने वाढ झाली. तर, चौदा बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ८१३ झाली आहे. 

जिल्ह्यात ९९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

सध्या जिल्ह्यात पाच हजार १८७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ६८३, ग्रामीण भागातील २५०, मालेगावचे ५६, तर जिल्‍हाबाह्य दोन रुग्ण आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ६२८, ग्रामीण भागातील ६०, मालेगावचे १८ आणि जिल्‍हाबाह्य दोन जणांचा समावेश आहे. तसेच, दिवसभरातील चौदा मृत्‍यूंमध्ये शहरातील सात, ग्रामीणचे सहा, मालेगावच्‍या एका रुग्‍णाचा समावेश आहे. सध्या उपचार घेत असलेल्‍या पाच हजार १८७ रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार ८३५, नाशिक ग्रामीणचे एक हजार ६३८, मालेगावचे ७०५, जिल्‍हाबाह्य नऊ रुग्‍ण उपचार घेत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ७७१ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ३३, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २६८, मालेगाव रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २३, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये १७, जिल्‍हा रुग्‍णालयात सहा संशयितांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा

मालेगावमध्ये पुन्हा उद्रेक 

मालेगाव : शहर व तालुक्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा उद्रेक झाला असून, दिवसभरात १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ५०, तर ग्रामीण भागातील ५५ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शहर व तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा व एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यात, संगमेश्‍वर व झोडगे येथील कोरोनाबाधित आणि कॅम्प भागातील ७५ वर्षीय संशयित रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाबळींची संख्या शहरात १०८, तर तालुक्यातील २४ झाली आहे. आज नव्याने २३ रुग्ण दाखल झाले. तर, ३६३ अहवाल प्रलंबित आहेत. शहरात सध्या ७३६ जणांवर उपचार सुरू असून, त्यापैकी जवळपास पाचशे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

हेही वाचा > वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of patients in Nashik district during the day Again on the threshold of thousand nashik marathi news