छगन भुजबळांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; भुजबळ होम क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले.

नाशिक : राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.

मुंबईतील कार्यालय एक आठवडा बंद

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

हेही वाचा > अजबच! बारा लाखांचे गाठोडे बाळगणाऱ्या 'त्या' फोटोमुळे प्रचंड मनस्ताप; काय घडले वाचा..​

हेही वाचा > आश्चर्यंच! चोवीस तासांत एकाच लॅबमध्ये आला धक्कादायक रिपोर्ट; रुग्णाने सांगितली आपबिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: officers and staff found positive in chhagan Bhujbal office nashik marathi news