प्रवासी म्हणून बसलेल्या भामट्यांचा धक्कादायक कारनामा; ओला वाहनचालकाने सांगितली आपबिती

विनोद बेदरकर
Friday, 27 November 2020

चौघांच्या टोळक्याने २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नाशिकहून सिन्नर येथे जाण्यासाठी म्हणुन ओला कंपनीच्या ऍपवरून ऑनलाईन चारचाकी गाडी बुक केली पण त्यांच्या डोक्यात मात्र वेगळेच कारस्थान शिजत होते..

प्रवासाच्या बहाण्याने चालकाची लूट 
नाशिक : चौघांच्या टोळक्याने २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नाशिकहून सिन्नर येथे जाण्यासाठी म्हणुन ओला कंपनीच्या ऍपवरून ऑनलाईन चारचाकी गाडी बुक केली पण त्यांच्या डोक्यात मात्र वेगळेच कारस्थान शिजत होते..

या  चार संशयितांनी सिन्नर येथे जाण्यासाठी म्हणुन ओला कंपनीच्या ऍपवरून ऑनलाईन चारचाकी गाडी बुक केली. गाडीचे चालक फेगडे यांनी २४ नोव्हेंबरला सायंकाळी सातला चौघांना पंचवटीतील मंडलीक मळा येथे जाऊन गाडीत बसवले. मात्र संशयितांनी रात्री गाडी सिन्नरला न नेता शिर्डीला घेऊन जाण्याची जबरदस्ती फेगडे यांना केली,  इतकेच नाही तर प्रवासात फेगडे यांचे हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

दोन दिवस फिरवली गाडी

दोन दिवस गाडी फिरवून फेगडे यांना तीस हजार रूपये दिले तर गाडी तुला परत देऊ अशी धमकी दिली व त्यांच्याकडील एटीएम, दोन मोबाईल काढून घेत त्यांना गाडीतून खाली फेकण्यात आले. व संशयितांनी फेगडे चालवत असलेली महिंद्रा वेरीटो कार (एमएच १५ ई ७८३७) घेऊन पळवून नेली.

चारचाकी गाडीसह २ लाख १५ हजाराची लूट

ऑनलाईन चारचाकी गाडी बुक करून प्रवासाच्या बहाण्याने चौघांच्या टोळक्याने चालकास मारहाण करत चारचाकी गाडीसह २ लाख १५ हजाराची लूटल्यचा प्रकार मंगळवारी (ता.२५) उघडकीस आला. याप्रकरणी राहुल प्रदिप फेगडे (२८, रा. उत्तमनगर, नवीन नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरिक्षक व्ही. व्ही. गिरी तपास करीत आहेत. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ola driver was beaten and robbed under the pretext of traveling