esakal | ''जीवापेक्षा घर महत्वाचे होते का?''..बायकोच्या भावना झाल्या अनावर...
sakal

बोलून बातमी शोधा

man suicide.jpg

रोजच्या धकाधकीच्या जीवनाला ते  कंटाऴले आणि पाच महिन्यांपासून वेतनही मिळत नव्हते. त्यामुळे, घर बांधण्यासाठी देखील त्यांना अडचणी येत असल्याने त्यांनी जे काही केले ते मात्र, धक्कादायक होते.

''जीवापेक्षा घर महत्वाचे होते का?''..बायकोच्या भावना झाल्या अनावर...

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : पुणे येथील खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या निंबा रामदास पवार (वय 58, मूळ रा. नामपूर) यांनी चिठ्ठी लिहून शनिवारी जीवनयात्रा संपविली. 
 
 असा आहे प्रकार...
पाच महिन्यांपासून वेतन नसल्याने व घर बांधण्यासाठी अडचणी येत असल्याने श्री.पवार यांनी नैराश्‍यातून आत्महत्या केली. मालेगाव येथील मनमाड चौफुली भागातील इस्सार पेट्रोलपंपाच्या पाठीमागील झाडाला मफलरने गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपविली. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. श्री. पवार पुणे येथून नामपूरला गावाकडे येत होते. मनमाड चौफुलीवर उतरल्यानंतरच त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. श्री. पवार यांच्या खिशात जी चिठ्ठी सापडली त्यात वेतन मिळत नसल्याचे व घर बांधण्यासाठी पैसे नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा > 'जो आपल्याशी नडला त्याला आपण फोडला!'...'इथं' गुंडच देताय पोलिसांना आव्हान 

मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात...

त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. पोलिस शिपाई राजू पिंपळसे यांच्या माहितीवरून किल्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज सायंकाळी येथील सामान्य रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. 

हेही वाचा > प्राप्तिकर कलम 80 अभावी जग सुनासुना!