धरण पुलावरच काळाने घेरले! दुचाकी घसरली धरणात; वणी-नाशिक रस्त्यावरील प्रकार

दिगंबर पाटोळे
Wednesday, 11 November 2020

वणीहून नाशिककडे जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आटपून आदिवासी बचाव आंदोलनाचे सक्रिय सदस्य प्रवीण जाधव, मनोज कराटे यांनी तातडीने १०८ ला फोन करून रुग्णवाहिकेस पाचरण करीत पोलिसांनाही माहिती दिली. काय घडले नेमके वाचा....

वणी (नाशिक) : वणीहून नाशिककडे जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आटपून आदिवासी बचाव आंदोलनाचे सक्रिय सदस्य प्रवीण जाधव, मनोज कराटे यांनी तातडीने १०८ ला फोन करून रुग्णवाहिकेस पाचरण करीत पोलिसांनाही माहिती दिली. काय घडले नेमके वाचा....

धरण पुलावरच काळाने घेरले!

ओझरखेड गावाजवळील ओझरखेड धरण सांडवा पुलावर दुचाकी (एमएच १५, बीजी ७८६०)ने धीरज दिलीप मंगरुले (वय ३०) व सुभाष घाडगे (वय ३६, दोघे रा. कातर, खटाव, जि. सातारा) वणी बाजूकडून नाशिककडे जाताना समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाइटमुळे दुचाकीचालकाचा तोल जाऊन दुचाकी घसरली. यात धीरज मंगरुले गंभीर जखमी होऊन ठार झाले. तर सुभाष घाडगे हे गंभीर जखमी झाले. याचवेळी वणीहून नाशिककडे जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आटपून आदिवासी बचाव आंदोलनाचे सक्रिय सदस्य प्रवीण जाधव, मनोज कराटे यांनी तातडीने १०८ ला फोन करून रुग्णवाहिकेस पाचरण करीत पोलिसांनाही माहिती दिली. 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

पुलावर मोठमोठ्या खड्ड्यांचा बळी
दरम्यान, दोन महिन्यांपासून पुलाच्या दोन्ही बाजूने रस्त्याचे काम सुरू आहे. तर पुलावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कामाच्या ठिकाणी रेडियम वा बॅरिकेडिंग लावलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ठेकेदाराकडून कामात मोठी दिरंगाई होत असून, या ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत वणी येथील अनिल गांगुर्डे यांनी वणी पोलिसांत रस्त्यावर होणारे अपघात व सुरक्षेच्या दृष्टीने ठेकेदाराकडून उपाययोजना केल्या नसल्याची तक्रार दाखल केली आहे.  वणी-नाशिक रस्त्यावरील ओझरखेड धरण सांडव्यावरील पुलावर रविवारी (ता. ८) रात्री आठच्या सुमारास दुचाकी घसरून दुचाकीस्वार ठार, तर एकजण जखमी झाला. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One died bike fell on Ozarkhed dam bridge nashik marathi news