लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठावे - सूरज मांढरे

One hundred percent goal of vaccination should be achieved Collector Suraj Mandhare Nashik News
One hundred percent goal of vaccination should be achieved Collector Suraj Mandhare Nashik News

नाशिक : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेतील २८ दिवसानंतर देण्यात येणाऱ्या लसीकरणाची यादी अद्ययावत करण्यात यावी. तसेच बूस्टर डोस सर्वजण वेळेत घेतील याची सतत शहानिशा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. २३) केल्यात. 

मांढरे म्हणाले, की १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या लसीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संबंधितांना अवगत करणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. नागरिकांसाठी काही दिवसांत लसीकरण सुरू होणार असल्यामुळे त्याबाबत सर्वस्तरावर व्यवस्था असल्याची खात्री करावी. 


४१ हजार लसीकरण 

लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव होण्यास मदत होणार आहे. आजपर्यंत साधारण ४१ हजार ८०७ लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, असे श्री. मांढरे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आजपर्यंतच्या लसीकरण कार्यक्रमामध्ये ज्या बाबींमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक वाटत आहे, याबाबत सरकारकडून निर्देश प्राप्त करून घेण्याच्या सूचना मांढरे यांनी नोडल अधिकाऱ्यांना दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत  मांढरे बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश नांदापूरकर आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com