मनमाड बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद; ऐन सणासुदीत शेतकरी अडचणीत

अमोल खरे
Monday, 26 October 2020

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.२६) सोमवारी कांदा व्यापाऱ्यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कांद्याची आवक न आल्याने लिलाव बंद ठेवण्यात आले.

नाशिक/मनमाड - केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रात ठेवण्यासाठी कांदा साठवणुकीवर  निर्बंध घातल्याने मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने  कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. लिलाव बंद ठेवण्याच्या व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी सणासुदीच्या दिवसात अडचणी सापडले आहेत.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.२६) सोमवारी कांदा व्यापाऱ्यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कांद्याची आवक न आल्याने लिलाव बंद ठेवण्यात आले. गेल्या काही दिवसात कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात तेजी उसळलेली. त्यातच निसर्गाचा कोप व्हावा अगदी त्याप्रमाणे झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीपिकांना झाला. त्यामुळे शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला गेला आहे. त्यातच कांदा या शेतीमालाच्या वाढत्या बाजार भावावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्याने कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. लिलाव बंद असल्याने व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी सणासुदीच्या दिवसात अडचणी सापडले आहेत.

हेही वाचा >  पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion auction closed at Manmad Market Committee nashik marathi news