कांदा निर्यातबंदी : खासदारांच्या घरा समोर करणार 'राख-रांगोळी' आंदोलन; संतप्त शेतकाऱ्यांचा इशारा

onion export ban innovative agitation nashik marathi newsonion export ban innovative agitation nashik marathi news
onion export ban innovative agitation nashik marathi newsonion export ban innovative agitation nashik marathi news

नाशिक : देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ खासदारांच्या घरा समोर 'राख-रांगोळी' आंदोलन करणार असल्य‍ची घोषणा शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडवे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आनिल घनवट यांनी दिली आहे.

खासदारांच्या घरा समोर आंदोलन

सहा महिने ‍शेतकर्‍यांनी कांदा मातीमोल भावाने विकला. आता कुठे किमान खर्च भरुन निघेल असे भाव मिळू लागले तर केंद्र शासनाने अचानक निर्यातबंदी करुन कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी संकटात असताना शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला अशा पद्धतीने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान करण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांचेच नव्हे तर देशाचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. दरम्यान शेतकर्‍यांनी निवडुन दिलेले खासदार आपले कर्तव्य विसरले असल्याने त्यांना कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी, महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या खासदारांच्या घरा समोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्या दरम्यान १४ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने काढलेला निर्यातबंदी आदेश जाळून राख करून कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेकडून  करण्यात येणार आहे. 

निर्यातबंदी हा शेतकर्‍यांचा विश्वासघात

जुन महिन्यात केंद्र शासनाने शेती माल व्य़ापार कायद्यात दुरुस्ती करुन शेतीमाल व्यापार खुला करुन कुठेही विकण्याची परवानगी दिली, कांदा आवश्यक वस्तू कायद्यातुन वगळला आहे. शेतकरी संघटनेने शासनाच्या या निर्णयाला पाठिंब‍ दिला होता. पण तिनच महिन्यात पुन्हा निर्यातबंदी लादून शेतकर्‍यांचा विश्वास घात केला आहे. देशांतर्गत तसेच विदेशातही कांद्याला चांगली मागणी असताना केलेली निर्यातबंदी ही शेतकर्‍यां बरोबर निर्यातदारांचे ही मोठे नुकसान करणारी आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासहार्यता संपत चालली आहे. निर्याती बाबत भारताच्या धरसोड भुमिकेमुळे भारताकडुन कांदा आयात करणारे देश इतर देशांकडे वळत आहेत. जागतिक कांदा बाजार एकेकाळी ८०% असलेला भारताचा वाटा आता  ४०% वर आला आहे.

देशाच्या व शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करुन केंद्र शासनाने त्वरित निर्यातबंदीचा आदेश मागे घ्यावा अन्यथा बुधवार २३ सप्टेंबर रोजी राज्यातील खासदारांच्या घरा समोर आदेशाची राख करून कांद्य‍ाची रांगोळी काढण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे  - अनिल घनवट, शेतकरी संघटना, अध्यक्ष

संपादन - रोहित कणसे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com