
पिंपळगाव बसवंत, लासलगावमध्ये तुर्की, अफगाणचा कांदा दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा घात झाला आहे. "मेक इन इंडिया' आत्मनिर्भर भारत, "बी व्होकल फॉर द लोकल' या घोषणा म्हणजे सरकारचे जुमले होते का? असा प्रश्न शेतकरी नेते हंसराज वडघुले यांनी केला आहे.
नाशिक : तेजीत असलेले कांद्याचे दर पाडण्यासाठी केद्र शासनाने तुर्कस्तान, अफगाणिस्तान, इजिप्तसह परदेशातील कांद्याच्या आयातीला पायघड्या घातल्या. देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठांत हा कांदा पोचला आहे. पिंपळगाव बसवंत, लासलगावमध्ये तुर्की, अफगाणचा कांदा दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा घात झाला आहे. "मेक इन इंडिया' आत्मनिर्भर भारत, "बी व्होकल फॉर द लोकल' या घोषणा म्हणजे सरकारचे जुमले होते का? असा प्रश्न शेतकरी नेते हंसराज वडघुले यांनी केला आहे.
परदेशी कांदा कोणाच्या हितासाठी?
अफगाणिस्तानच्या कांद्याचा आकार जम्बो आहे, तर तुर्कीचा कांदा उग्र वास व चवीत वांधा आहे. पिंपळगाव बसवंत व लासगावला सुमारे चारशे टन कांदा व्यापाऱ्यांनी परदेशातून आयात केला आहे. महाराष्ट्रातील नाशिक, नगर जिल्ह्यासह बेंगळुरू, इंदूर येथे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. पावसाने लाल कांद्याची दाणादाण उडवून दिल्याने मोठी नासाडी झाली. यासंदर्भात श्री. वडघुले म्हणाले, भाजप समर्थक नेते सतत देशातील विरोधकांना पाकिस्तानात जाण्याचा इशारा देत असतात. मात्र आता ते भारतीय शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी थेट पाकिस्तान धार्जीनी भुमिका घेत आहे. हा विरोधाभास आता शत्रु देश धार्जीन्या तुर्कस्तानचा कांदा घेणार नाही अशी भुमिका मुंबईतील व्यापारी घटकाने घेतली आहे. तरी सुद्धा हाच कांदा स्थानिक कांद्यांमध्ये मिसळून देशांतर्गत बाजारपेठेत पाठवण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास करत आहे.
हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच
तर असंतोषाचा उद्रेक होईल...
ग्राहकांना कांदा किरकोळ बाजारात आजही पन्नास ते साठ रुपये किलो दराने मिळत आहे. परदेशी कांदा सुद्धा किरकोळ बाजारात सरासरी याच दराने मिळणार आहे. मग परदेशी कांदा ग्राहकांसाठी की नाफेड आणि आयातदारांच्या "अर्थपुर्ण" हितासाठी?. कांदा दर पाडण्यासाठी केंद्र सरकारच्या हट्टामुळे शेतकरी संतप्त असुन केंद्र सरकारने शहाणपणाची भुमिका घेतील नाही तर असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा शेतकरी नेते हंसराज वडघुले यांनी दिला आहे.
हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला