Onion Export Ban : सायखेड्यात तीन तास कांदा मार्केट बंद ; निर्यातबंदी उठविण्याची मागणी

संजय भागवत 
Tuesday, 15 September 2020

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने सायखेडा येथे व्यापारी वर्गाने तीन तास सायखेडा येथील कांदा मार्केट मधील कांदा लिलाव बंद केले.अखेर तीन तासानंतर कांदा लिलाव सुरू झाले. परंतू पाचशे ते सातशे रूपये कांद्याला कमी दर मिळाले. शेतकरीवर्ग नाराज झाला.कांदा उत्पादक शेतकर्यांनी कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी अशा आशयाचे निवेदन सायखेडा पोलिस स्टेशन चे साहाय्यक पोलिस निरीक्षक अङसुळ यांच्या मार्फत तहसीलदार यांना देण्यात आले.

नाशिक / सायखेडा :  केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने सायखेडा येथे व्यापारी वर्गाने तीन तास सायखेडा येथील कांदा मार्केट मधील कांदा लिलाव बंद केले.अखेर तीन तासानंतर कांदा लिलाव सुरू झाले. परंतू पाचशे ते सातशे रूपये कांद्याला कमी दर मिळाले. शेतकरीवर्ग नाराज झाला.
कांदा उत्पादक शेतकर्यांनी कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी अशा आशयाचे निवेदन सायखेडा पोलिस स्टेशन चे साहाय्यक पोलिस निरीक्षक अङसुळ यांच्या मार्फत तहसीलदार यांना देण्यात आले.

व्यापारी वर्गाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांदयावर अवलंबून

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात सर्वच  शेतकरी कांदा उत्पादक असून येथे मोठ्या प्रमाणात दर्जेदार कांदा पिक घेतले जाते. येथील शेतकऱ्यांची त्यावर अवलंबून असलेल्या व्यापारी वर्गाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांदयावर अवलंबून आहे. सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा हा निर्यातिसाठी सीमेवर अड़कुन पडला आहे. त्यासाठी सीमा खुली करावी. कांदयाच्या किमती खुप वाढल्या नसून अजूनही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात असल्याने तातडीने निर्यात बंदी उठवणे गरजेचे आहे.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

शेतकरी, व्यापारी, वाहतुकदार यांना दिलासा द्यावा,

आधीच लॉकडाउनच्या संकटकाळातुन शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असतांना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल व त्यांचे मोठे नुकसान होईल. ह्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करुन कांदयावरची निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतुकदार यांना दिलासा द्यावा, तसेच आधीच निसर्ग व कोरोनाच्या प्रकोपाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion market closed for three hours by traders in Saykheda nashik marathi news