कांद्याच्या भावात वाढ! बंदरात अन् सीमेवर अडकवलेल्या ४० टक्के कांद्याचे नुकसान  

महेंद्र महाजन
Tuesday, 22 September 2020

 केंद्राने १४ सप्टेंबरला सायंकाळी कांदा निर्यातबंदीची अधिसूचना जारी केली. पण कस्टमतर्फे त्यादिवशी सकाळपासून मुंबई, चेन्नई, तुतीकोरीन बंदरासह बांगलादेश, नेपाळच्या सीमेवर कांदा अडवण्यात आला. निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन आणि व्यापाऱ्यांच्या नाराजीच्या अनुषंगाने केंद्राने अडकवलेला कांदा निर्यातीला परवानगी देण्याची भूमिका स्वीकारली.

नाशिक : कांदा निर्यातबंदीने केंद्राला फारसे समाधान मिळेल, अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. मागील आठवड्याच्या अखेरच्या तुलनेत सोमवारी (ता. २१) जिल्ह्यातील बाजारपेठांमधून क्विटंलला सरासरी ५०० ते अकराशे रुपयांनी वाढ झाली. शनिवारी (ता. १९) दोन हजार ३०० ते तीन हजार रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री झाली होती.

अडकवलेला कांदा निर्यातीला परवानगी देण्याची भूमिका

सोमवारी तीन हजार ४०० ते तीन हजार ९५० रुपये असा भाव मिळाला. देशांतर्गत मागणी वाढताच, कांदा चाळीस हजार पार करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. केंद्राने १४ सप्टेंबरला सायंकाळी कांदा निर्यातबंदीची अधिसूचना जारी केली. पण कस्टमतर्फे त्यादिवशी सकाळपासून मुंबई, चेन्नई, तुतीकोरीन बंदरासह बांगलादेश, नेपाळच्या सीमेवर कांदा अडवण्यात आला. निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन आणि व्यापाऱ्यांच्या नाराजीच्या अनुषंगाने केंद्राने अडकवलेला कांदा निर्यातीला परवानगी देण्याची भूमिका स्वीकारली. प्रत्यक्षात मात्र निर्यातबंदीच्या आदल्यादिवशी कांदा निर्यातीसाठी पाठवण्याचे धोरण स्वीकारले गेले. ३० टक्के कांद्याचा प्रश्‍न निकाली निघाला. उरलेल्या ७० टक्के कांद्याचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे बंदरासह सीमेवर ४० टक्के कांद्याचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

बंदरात अन् सीमेवर अडकवलेल्या ४० टक्के कांद्याचे नुकसान 

निर्यातदारांनी रविवार (ता. २०)पर्यंत केंद्राकडे परवानगीचा आग्रह भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून धरला. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बांगलादेशच्या सीमेवरून २२५ पैकी ८० ट्रक परत मागवण्याची माहिती निर्यातदारांनी दिली. कंटेनर आणि ट्रकमागे होणाऱ्या नुकसानीच्या झळा सहन करून परत आणलेला कांदा देशांतर्गत ग्राहकांसाठी निर्यातदारांना विकावा लागणार आहे. 

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ
सर्वाधिक भाव सटाण्यामध्ये 
जिल्ह्यातील सर्वाधिक भाव सटाण्यामध्ये मिळाला. क्विटंलला तीन हजार ९५० रुपये या सरासरी भावाने तिथे कांद्याची विक्री झाली. कळवणमध्ये तीन हजार ९०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. इतर बाजारपेठांमध्ये क्विटंलला सरासरी मिळालेला भाव रुपयांमध्ये असा : येवला- साडेतीन हजार, मुंगसे- तीन हजार ४००, चांदवड- तीन हजार ५००, मनमाड- तीन हजार ७००, पिंपळगाव- तीन हजार ६५१, देवळा- तीन हजार ६००, उमराणे- तीन हजार ८००, लासलगाव- तीन हजार ८००. 

कांद्याच्या भावातील वाढ 
(शनिवार आणि आजच्या भावाच्या आधारे) 

येवला : ७०० 
मुंगसे : एक हजार ७० 
कळवण : ९०० 
चांदवड : ५०० 
मनमाड : अकराशे 
पिंपळगाव : अकराशे 
लासलगाव : अकराशे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices increase nashik marathi news