लासलगावला कांद्याच्या भावामध्ये दोन दिवसांत चक्क 'इतकी' घसरण!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

सुरतमध्ये मात्र पाचशे रुपयांनी भावात वाढ होऊन पाच हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. आग्रा येथे चार हजार 100 रुपये क्विंटल असा स्थिर भाव राहिला. इंदूरमध्ये मात्र चारशे रुपयांनी भावात घसरण होऊन शेतकऱ्यांना चार हजार 100 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. कर्नूलमध्ये 190 रुपयांनी भाव कमी होऊन चार हजार 610 रुपये क्विंटलने कांद्याची विक्री झाली.

नाशिक : कांद्याची आवक वाढताच, दोन दिवसांमध्ये भावात मोठी घसरण झाली आहे. लासलगावमध्ये चार हजार 855 रुपये प्रतिक्विंटलने विकलेला कांदा बुधवारी (ता. 22) तीन हजार 900 रुपये या भावाने शेतकऱ्यांना विकावा लागला. ही घसरण 955 रुपयांची आहे. दिल्लीतील राजधानी भागात नाशिकचा कांदा घाऊक स्वरूपात साडेपाच हजार रुपये क्विंटल भावाने विकला गेला आहे.

दिल्ली राजधानी भागात नाशिकच्या कांद्याला साडेपाच हजारांचा भाव

सटाण्यामध्ये क्विंटलमागे 895, उमराणेमध्ये 855 रुपयांनी भाव घसरला आहे. देवळ्यात 535, मनमाडमध्ये 700, येवल्यात 650, मुंगसेत 525, चांदवडमध्ये 570, नाशिकमध्ये 700, पिंपळगाव बसवंतमध्ये 434 रुपयांनी भाव कमी झाला आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बुधवारी क्विंटलभर कांद्याला मिळालेला भाव रुपयांमध्ये असा ः देवळा- चार हजार 205, मनमाड- तीन हजार 900, येवला- चार हजार 31, मुंगसे- चार हजार 800, चांदवड- तीन हजार 700, उमराणे- चार हजार, नाशिक- चार हजार 300, पिंपळगाव- तीन हजार 991, सटाणा- तीन हजार 905. बेंगळुरूमध्ये महाराष्ट्रातील कांद्याच्या भावात 400 रुपयांची घसरण होऊन चार हजार 800 रुपये, तर कर्नाटकमधील कांदा चार हजार 200 रुपये या भावाने विकला गेला. कर्नाटकमधील कांद्याचे भाव दोनशे रुपयांनी कमी झाले.

सुरतला पाच हजारांचा भाव
सुरतमध्ये मात्र पाचशे रुपयांनी भावात वाढ होऊन पाच हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. आग्रा येथे चार हजार 100 रुपये क्विंटल असा स्थिर भाव राहिला. इंदूरमध्ये मात्र चारशे रुपयांनी भावात घसरण होऊन शेतकऱ्यांना चार हजार 100 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. कर्नूलमध्ये 190 रुपयांनी भाव कमी होऊन चार हजार 610 रुपये क्विंटलने कांद्याची विक्री झाली.

नक्की पाहा >VIDEO> महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा समृद्धी बोगदा पाहिला का? 
 

राज्यातील कांद्याचे भाव (आकडे प्रतिक्विंटल रुपयांमध्ये)
बाजारपेठ बुधवारचा भाव
मुंबई पाच हजार
नागपूर चार हजार 500
पुणे चार हजार 200
कोल्हापूर चार हजार 200
औरंगाबाद चार हजार 200
सोलापूर चार हजार 800

हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion prices at lasalgaon Nashik Marathi News