कांदा बियाणे चोरट्यास धुळ्यातून अटक; घरातून २७ हजारांचे बियाणे जप्त

रविंद्र पगार
Tuesday, 13 October 2020

शहरातील कळवण-देवळा रोडवरील न्यायालयासमोर असलेल्या अतुल रौंदळ यांच्या मालकीच्या किसान ट्रेडर्स कृषी सेवा केंद्राच्या पाठीमागील बाजूचा पत्रा कापून चोरट्यांनी एक लाख ३५ हजार रुपयाचे कांदा बी आणि रोख रक्कम चोरून नेली होती.

नाशिक/कळवण : मागील आठवड्यात शहरातील कृषी सेवा केंद्रातून कांद्याचे बियाणे चोरी करणाऱ्या चोरट्यास कळवण पोलिसांनी धुळ्यातून अटक केली आहे. भिका भोई, असे अटक केलेला संशयिताचे नाव आहे. भिका हा सराईत चोरटा असून, यापूर्वीदेखील त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 

सापळा रचून संशयितास अटक

शहरातील कळवण-देवळा रोडवरील न्यायालयासमोर असलेल्या अतुल रौंदळ यांच्या मालकीच्या किसान ट्रेडर्स कृषी सेवा केंद्राच्या पाठीमागील बाजूचा पत्रा कापून चोरट्यांनी एक लाख ३५ हजार रुपयाचे कांदा बी आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना गुप्त माहिती मिळाली, की संबंधित गुन्हा हा संशयित भिका भोई (रा. लोंढा नाला, अकलाड-मोराणे, जि. धुळे) याने केला असून, तो त्याच्या मूळगावी आहे. त्यानंतर कळवण पोलिसांचे एक पथकाने धुल्यात पोचत सापळा रचून संशयित भिका भोई यास अटक केली

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

२७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 

त्याच्या घरातून २७ हजार रुपये किमतीचे कांदा बियाणे जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश निकम, पोलिस हवालदार मधुकर तारू, शिवाजी शिंदे, सुरेश पवार यांनी केली.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

 

संपादन - रोहित कणसे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion seed thief arrested from Dhule nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: