धर्मांतर घोषणा वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन मुक्ती महोत्सव 

muktabhumi yeola 1.jpg
muktabhumi yeola 1.jpg

येवला (जि.नाशिक) : ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार (ता.१०)पासून मंगळवार (ता.१३)पर्यंत यू-ट्यूब ऑनलाइन-मुक्ती महोत्सव होणार असल्याची माहिती मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक तथा प्रवर्तक शरद शेजवळ यांनी दिली. 


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ ला येथे ही ऐतिहासिक घोषणा केली. त्याचा वर्धापनदिन कोरोनामुळे साधेपणाने होणार आहे. शनिवारी पहिल्या दिवशी ऑनलाइन मंगल कामना व्हिडिओ संदेश पालकमंत्री छगन भुजबळ देणार आहेत. कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते साथी संतोष बुरंगे यांच्या हस्ते उदघाटन होईल. ज्येष्ठ नेते प्रकाश वाघ अध्यक्षस्थानी असतील.

दोन ते तीनला ‘धर्मांतरित बौद्ध व भारताची जनगणना- २०२१’ याविषयावर जाहीर व्याख्यान ॲड. अनिल वैद्य (माजी न्यायाधीश, नाशिक) देणार असून, चंद्रकांत गायकवाड अध्यक्षस्थानी असतील. शरद शेजवळ प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन मिलिंद पगारे करणार आहेत. रविवारी (ता. ११) दुपारी दोन ते तीनला धम्म व संविधान चळवळ महिलांनी हाती घ्यावी याविषयावर श्‍याम तागडे (प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन) यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षा प्रा. सुवर्णा पगारे असतील. वंदना नागपुरे सूत्रसंचालन करतील. सविता धिवर आभार मानतील. सोमवारी (ता. १२) दुपारी दोन ते तीन या वेळेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता व आजचे समाज माध्यम’ याविषयावर पत्रकार सुधीर लंके यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे.

पत्रकार योगेंद्र वाघ अध्यक्षस्थानी असतील. मिलिंद गुंजाळ सूत्रसंचालन करतील. मंगळवारी दुपारी दोन ते तीन या वेळेत आंबेडकरवादी गझल संगीती या कार्यक्रमाने समारोप होणार आहे. आंबेडकरवादी गझल संमेलनात प्रसिद्ध आंबेडकरवादी गझलकार प्रा. जगदीश घनघाव, डॉ. कैलास गायकवाड, सुनील ओवाळ (मुंबई), सूर्यकांत मुनघाटे (नागपूर), अण्णा त्रिभुवन (वासी), सचिन साताळकर (येवला), अत्ताम गेंदे (परभणी), प्रीती जमधडे (चिमूर), छाया सोनवणे (जळगाव), संदीप वाकोडे (अकोला), मिलिंद इंगळे, नुमान शेख (लासलगाव) या महाराष्ट्रातील मान्यवरांचा सहभाग असणार आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com