सावधान! " मी कस्टमर केअरमधून बोलतोय" अन् बोलता बोलता लावला चांगलाच चुना..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

समोरून एक फोन येतो...म्हणतो..मी कस्टमर केअरमधून बोलतोय..अन् बोलता बोलता तो तुम्हाला सगळे डिटेल्स विचारतो..अन् मग चांगलाच चुना लावतो..कसा तो वाचा...

नाशिक : समोरून फोन येतो...म्हणतो..मी कस्टमर केअरमधून बोलतोय..अन् बोलता बोलता तो तुम्हाला सगळे डिटेल्स विचारतो..अन् मग चांगलाच चुना लावतो..कसा तो वाचा...

असा घातला गंडा...

ऑनलाईन भामट्यांनी शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना सुमारे सात लाख रुपयांचा चूना लावला. बॅंकेच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचे भासवून संशयिताने गोपनीय माहितीच्या आधारे सहा लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी किशा आप्पा भदाने (रा. इंद्रनगरी, त्रिमुर्ती चौक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या 10 ते 15 तारखेदरम्यान संशयिताने मोबाईवरून भदाने यांना संपर्क साधत, ऍक्‍सीस बॅंकेच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना नेट बॅंकिंग व खाते अद्यावत करण्याची बतावणी करीत मोबाईलवर आलेला ओटीपी त्यांच्याकडून घेतला आणि त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून 5 लाख 99 हजार 790 रूपये ऑनलाईन काढून घेतले. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

दुसऱ्या घटनेत वाचा काय केले?
तर, दुसऱ्या घटनेत सॅनिटायझर मिशन खरेदीचे अमीष दाखवून क्‍युआर कोडच्या माध्यमातून 67 हजार 500 रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रशांत काशिनाथ गिते (रा. पांगरेनगर, बडदेनगर) यांच्या फिर्यादीनुसार, सॅनिटायझर मशिन खरेदी करण्यासाठी अज्ञात संशयिताने फोनवरून संपर्क साधला. त्यासाठीची रक्कम अगोदरच गुगल पे या ऍपद्वारे करीत असल्याचे सांगून संशयिताने एक क्‍युआर कोड गिते यांच्या शेजाऱ्याच्या मोबाईलवर पाठविला. गिते यांना संशयिताने तो क्‍युआर-कोड स्कॅन करण्यास सांगितले. त्यानुसार, कोड स्कॅन होताच काही वेळातच गिते यांच्या बॅंक खात्यातून 67 हजार 500 रूपयांची रक्कम ऑनलाईन परस्पर वर्ग होत त्यांची फसवणूक झाली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करीत आहेत. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online fraud with both persons nashik marathi news