लग्नाची गाठ बांधून देणाऱ्या बंटी-बबलीचा पोबारा..लावला 'एवढ्याला' चुना!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

गेल्या 31 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान संकेतस्थळावर डॉ. नेहा जोशी यांनी लग्नासाठी नोंदणी केली. त्यावर नेहाकडे शासनाच्या आरोग्य विभागात उपसचिव असल्याचे ओळखपत्र होते. तसेच तिचा भाऊ महेंद्र जोशी यानेही सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणमध्ये असल्याचे भासविले,

नाशिक : लग्नाच्या ऑनलाइन संकेतस्थळांवर बोगस सरकारी अधिकारी असल्याचे भासविले. लग्नाचे आमिष दाखवत आर्थिक गंडा घातल्याप्रकरणी संशयित बंटी-बबलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. नेहा जोशी, महेंद्र जोशी अशी दोघा संशयितांची नावे आहेत. या दोघांविरोधात सरकारवाडा आणि सायबर पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

असा घडला प्रकार

सचिन ठोके (रा. वनश्री कॉलनी, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची विवाह जमविणारी संस्था असून, www.lagnasohalaa.com हे संकेतस्थळ आहे. गेल्या 31 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान संकेतस्थळावर डॉ. नेहा जोशी यांनी लग्नासाठी नोंदणी केली. त्यावर नेहाकडे शासनाच्या आरोग्य विभागात उपसचिव असल्याचे ओळखपत्र होते. तसेच तिचा भाऊ महेंद्र जोशी यानेही सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणमध्ये असल्याचे भासविले, संस्थेमार्फत अजिंक्‍य बारगजे यांच्याशी लग्नाचे आमिष दाखवून 38 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव तपास करीत आहेत. 

हेही वाचा > #Lockdown : 'लॉकडाउन'च्या अंधारावर उमटली चार चिमुकली पावले...'ते' देवदूतासारखे धावले मदतीला!
 
दुसरी घटना : दोघांची गळफास घेत आत्महत्या 
नाशिक : इंदिरानगर परिसरातील जितेंद्र माळी (वय 40) याने मंगळवारी (ता. 7) राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला होता. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे, तर पंचवटीत श्रीचंद जांगीड (42, रा, तुळशी अपार्टमेंट, सीतागुंफा, पंचवटी) याने बुधवारी घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत नोंद करण्यात आली. 

हेही वाचा > "कोरोना व्हायरस''चा ऑनलाइन जगतातही संसर्ग...सावध व्हा!...कारण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online fraud for marriage bait nashik crime news