शहरात ऑनलाइन लोन ॲप एकही फसवणुक नाही; मात्र गाफील राहणे पडेल महागात

तुषार महाले
Thursday, 21 January 2021

ऑनलाइन ॲपमधून कर्ज घेताना ग्राहक अटी व शर्ती काय आहेत वाचत नसल्याने अशा अनेक बनावट ॲपला बळी पडत असल्याचे दिसत आहे. ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप कंपन्या संबंधितांना जाहिरातीच्या माध्यमातून त्यानंतर कॉल करून कर्ज घेण्यास भाग पाडतात.

नाशिक : कोरोना लॉकडाउन काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसविताना मोठ्या कसरतीला सामोरे जावे लागत आहे. अशात ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲपचा वापर अनेकांकडून होत असून, यातून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, सुदैवाने नाशिकमध्ये अशा प्रकारचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. 

रकमेच्या ३० टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल

ऑनलाइन ॲपमधून काही सेकंदांत कर्ज उपलब्ध करून देणारी अनेक ॲप बनावट आहेत. या बनावट ॲपला कर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड लिंक करून फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. बनावट ॲप कर्जदाराला मोठ्या रकमेचे आमिष दाखवितात. त्यानंतर कर्जदाराने घेतलेल्या रकमेच्या ३० टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल केली जाते. या ॲपमध्ये कर्जदारांना काही अटी व शर्ती मान्य कराव्या लागतात. त्यानंतरच ऑनलाइन ॲप देणाऱ्या कंपन्या कर्जदाराला कर्ज देऊन त्याची फसवणूक करतात. ऑनलाइन ॲपमधून कर्ज घेताना ग्राहक अटी व शर्ती काय आहेत वाचत नसल्याने अशा अनेक बनावट ॲपला बळी पडत असल्याचे दिसत आहे. ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲप कंपन्या संबंधितांना जाहिरातीच्या माध्यमातून त्यानंतर कॉल करून कर्ज घेण्यास भाग पाडतात. कर्जदाराने कर्ज घेतल्यानंतर संबंधित ॲप कर्जदाराला त्रास देण्यास सुरवात करतात. 

नागरिकांनी सावध राहण्याची गरज 

या ॲपमधून अधिक व्याजासह छुपी रक्कम आकारली जाते. त्यामुळे अशा बनावट ॲपपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. नाशिकमध्ये ऑनलाइन लोन ॲपमधून फसवणूक झाल्याचा प्रकार घडलेला नाही. मात्र, फसवणूक झालेले तक्रार करण्यास ऑनलाइन ॲपच्या अटी व शर्तींमुळे पुढे आले नसतील, असाही प्रश्‍न समोर येत आहे. खोटी आमिषे दाखवून ग्राहकांची फसवणूक करणारे तसेच कर्ज देणारे बनावट ॲपच्या तक्रारीसाठी आरबीआयने सचेत पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

ऑनलाइन कर्ज देणाऱ्या बनावट ॲपद्वारे फसवणूक झाल्याचा एकही प्रकार नाशिकमध्ये घडलेला नाही. अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यास तक्रार दाखल केली जाईल. नागरिकांनी अशा ॲपपासून दूर राहत बनावट ॲपच्या अटी व शर्ती मान्य करू नयेत. - श्रीपाद परोपकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम  

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online loan app There are no complaints of fraud in Nashik crime news