'इथे' होणार मूग, उडदाची हमीभावाने खरेदी; शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

संतोष विंचू
Wednesday, 16 September 2020

चालू वर्षी जिल्ह्यात मूग,उडीदाचा पेरा चांगला असून मुगाचे पीक बाजारात विक्रीला आले आहे.सुरुवातीच्या टप्प्यात बाजारात सात हजाराचा भाव असल्याने अनेकांनी कांदा लागवडीचे भांडवल उभे करण्यासाठी मुगाची विक्री केली आहे. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत मूग, उडीद जपून ठेवला आहे.

नाशिक/येवला : चालू वर्षी शासकीय हमीभावाने मुगाची व उडीदाची खरेदी करण्यासाठी येवला व मालेगाव येथे सहकारी संघांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन नाव नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे.

अखेर हमीभावाने खरेदी

चालू वर्षी जिल्ह्यात मूग,उडीदाचा पेरा चांगला असून मुगाचे पीक बाजारात विक्रीला आले आहे.सुरुवातीच्या टप्प्यात बाजारात सात हजाराचा भाव असल्याने अनेकांनी कांदा लागवडीचे भांडवल उभे करण्यासाठी मुगाची विक्री केली आहे. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत मूग, उडीद जपून ठेवला आहे. त्यामुळे शासकीय हमीभावाने खरेदी सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. त्यानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ व मालेगाव तालुका शेतकरी संघ या संस्थानायबखरेदीला परवानगी दिली आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र

यावर्षी मुगाला ७ हजार १९६ रुपये प्रति क्विंटल तर उडीदाला सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव मिळणार आहे. मंगळवार (ता.१५) येथे खरेदीला मंजुरी मिळाली असून शेतकऱ्यांनी या केंद्रावर जाऊन ऑनलाइन नाव नोंदणी करावयाची आहे त्यासाठी पीक पेऱ्याची नोंद असलेला चालू हंगामातील सातबारा उतारा, बँक खात्याची पासबुकची झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स व सध्याचा सुरू असलेला मोबाईल नंबर केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे द्यायचा आहे. त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ऑनलाईन नोंदणी होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांकडून मुगाची खरेदी सुरू होईल.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

 

संपादक - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online registration for minimum price nashik marathi news