
येवला (नाशिक) : खासगी बाजारात मक्याला हमीभावाच्या तुलनेत ३०० ते ५०० रुपये कमी दर मिळत असल्याने मोठे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी फेडरेशनकडे मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत, यासाठी सोमवारपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवार (ता.७) अखेर ७०३ शेतकऱ्यांनी एक हजार २५८ खातेदारांची कागदपत्रे ऑनलाइन नोंदणीसाठी संघाकडे जमा केली आहेत.
२७० खातेधारकांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण
येथील तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला खरेदी केंद्र म्हणून मान्यता असून, येथे नोंदणी सुरू आहे. शासकीय मका, बाजरी खरेदी केंद्रावर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर दुसऱ्यांदा ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी कागदपत्र स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. नावनोंदणीसाठी गर्दी होत असल्याने ज्येष्ठ नेते ॲड. माणिकराव शिंदे यांनी संघाकडून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत ४१० शेतकऱ्यांनी बनवलेली यादी ग्राह्य धरण्यास सांगितले. चार दिवसांत प्रतिदिवस १०० प्रमाणे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. ४१० शेतकऱ्यांकडून ७८० खातेदार शेतकऱ्यांचे कागदपत्र नंबरनुसार जमा करण्यात येऊन २७० खातेधारकांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे.
शिल्लक ५१० खातेदारधारकांची नोंदणी पूर्ण झाल्यावर सोमवार (ता. 9) पासून स्वीकारलेल्या अर्जाची ७८१ नंबरपासून नोंदणीला सुरवात होणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनीही बैठक घेतली होती. ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज नियमित स्वीकारण्यात येऊन प्रतीक्षा यादीप्रमाणे ऑनलाइन नोंदणी होईल, अशी माहिती अध्यक्ष अनिल सोनवणे, उपाध्यक्ष दगडू टर्ले, व्यवस्थापक बाबा जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.