esakal | 'नाशिकमध्ये लॉकडाउनची फक्त अफवाच' - जिल्हाधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

suraj-mandhare-.jpg

नाशिक शहर व ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. राज्यातील अन्य शहरांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थानिक प्रशासनाने लॉकडाउन केला आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्येही लॉकडाउन केला जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ​

'नाशिकमध्ये लॉकडाउनची फक्त अफवाच' - जिल्हाधिकारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : पुणे व ठाणे शहरांच्या धर्तीवर नाशिकमध्येही लॉकडाउन केला जाणार आहे, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भात प्रशासकीय तयारीही झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, ही अफवा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. १४) स्पष्ट केले.

सोशल मीडियावरील चर्चेला पूर्णविराम

नाशिक शहर व ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. राज्यातील अन्य शहरांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थानिक प्रशासनाने लॉकडाउन केला आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्येही लॉकडाउन केला जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात नियोजन आखले जात आहे. लवकरच नाशिकच्या लॉकडाउनची घोषणा केली जाणार असल्याचा दावा करणारे संदेश सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. मात्र, ही अफवा असल्याचे स्पष्ट करत, जिल्हाधिकारी म्हणाले, की शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये तातडीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील चार हजार ९६६ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज दिला आहे. दोन हजार ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्हा रुग्णालय तसेच महापालिका आरोग्य विभागाकडून परिश्रम घेतले जात आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी मांढरे यांनी मंगळवारी चांदवड येथे जाऊन खरीप हंगाम आणि कोरोना परिस्थितीचाही आढावा घेतला.

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!