कोविड रुग्णांसाठी तंबू हॉस्पिटलचा प्रस्ताव बारगळला! 'या' मैदानावर होणार होते हॉस्पिटल...

malegaon 1234.jpg
malegaon 1234.jpg

नाशिक : (मालेगाव) कोरोना रुग्ण व संपर्कात आलेल्यांना विलगीकरणासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाइन सेंटर सुरू केले असले तरी येथे सुविधा पुरवण्याबाबत प्रशासनावर ताण येत होता. तसेच अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. यामुळे आता शहरालगत खुल्या मैदानात किमान १ हजार खाटांचे क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, यावरून राजकारण सुरू झाल्याने सेंटर उभारणीस विरोध दर्शवला आहे.

मालेगाव बचाव समितीनेचा देखील ओपन टेन्टला विरोध

शहरात शेकडो शाळा-महाविद्यालयांच्या इमारती असताना, येथील रिलायबल किंवा मदरसा मिल्लत मैदानावर कोविड रुग्णांसाठी टेन्ट निवारा केंद्र करण्याचा प्रस्ताव अखेर म्यान करण्यात आला. महापौर ताहेरा शेख, महापालिकेतील सत्तारूढ गटाचे नेते माजी महापौर रशीद शेख यांच्यासह कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी उपायुक्त नितीन कापडणीस यांना टेन्टला विरोध असून, ते करू नये, असे निवेदन दिले. येथील रिलायबल मैदानावर स्थानिक रहिवाशांचा विरोध झुगारून कामाची तयारी सुरू झाली होती. गुरुवारी (ता. 14) सायंकाळी अवघ्या दहा मिनिटांसाठी आलेल्या जोरदार पावसाने या मनसुब्यांवर पाणी फेरले. याबाबतचे वृत्त "सकाळ'ने दिले.

निवारा केंद्रास विरोध असल्याचे निवेदन

या मैदानावर निवारा केंद्र होणार नसल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी "सकाळ'ला सांगितले. मात्र मदरसा मिल्लत ही पर्यायी जागा मनपा विरोधी गटातील सदस्यांनी सुचविली. राष्ट्रीय आपत्तीतदेखील शहरात राजकीय आरोप, प्रत्यारोप सुरूच होते. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या मालेगाव बचाव समितीनेही ओपन टेन्टला विरोध केला होता. अखेर लोकभावनेचा आदर करीत सत्तारूढ कॉंग्रेसनेही ओपन टेन्ट व मैदानावरील निवारा केंद्रास विरोध असल्याचे निवेदन सादर केले. 

महापालिका प्रशासनाने यावर निधी खर्च केला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खर्च करावयाचा निधी मनमानी पद्धतीने खर्च करण्याला चाप लागणार आहे. दोन दिवसांपूर्वीच म्हाळदे घरकुल येथील कोरोना निवारा केंद्र बंद होताच, 18 पंखे व 60 एलईडी असा 56 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com