मुक्‍त विद्यापीठ अंतिम वर्षाची ऑनलाइन परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये; विद्यापीठाचा निर्णय

महेंद्र महाजन
Sunday, 13 September 2020

अंतिम वर्षाच्‍या ज्‍या अभ्यासक्रमांचे प्रात्‍यक्षिक, मौखिक, प्रकल्‍प, चर्चासत्र परीक्षा यापूर्वी झालेल्‍या नाहीत, अशा सर्व परीक्षा २५ सप्‍टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने घेतल्‍या जाणार आहेत. यासाठी विविध व्हिडिओ कॉन्‍फरसिंग ॲपचा वापर केला जाईल. परीक्षेची गुणनोंदणी ३० सप्‍टेंबरपर्यंत करायची आहे. 

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्‍या परीक्षा ऑनलाइन स्‍वरूपात घेतल्‍या जाणार आहेत. ऑक्‍टोबरमध्ये या परीक्षा होतील. तत्‍पूर्वी गुरुवार (ता.१०)पासून २५ सप्‍टेंबरपर्यंत प्रात्‍यक्षिक, तोंडी परीक्षा पार पडणार आहे. 

परीक्षेची गुणनोंदणी ३० सप्‍टेंबरपर्यंत

सर्वोच्च न्‍यायालयाचा निर्णय तसेच शासन निर्णयातील निर्देशानुसार मुक्‍त विद्यापीठाच्‍या परीक्षा मंडळाची सोमवारी (ता.७) बैठक झाली. या वेळी झालेल्‍या निर्णयानुसार अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्‍या सर्व अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांच्‍या नियमित आणि अनुशेषांतर्गत (बॅकलॉग) च्‍या लेखी परीक्षा तसेच प्रात्‍यक्षिक, मौखिक, प्रकल्‍प, चर्चासत्र, स्‍टुडीओ वर्क परीक्षा आयोजनास अधिकार मंडळाची मान्‍यता दिली आहे. त्‍यानुसार अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्‍या ज्‍या अभ्यासक्रमांचे प्रात्‍यक्षिक, मौखिक, प्रकल्‍प, चर्चासत्र परीक्षा यापूर्वी झालेल्‍या नाहीत, अशा सर्व परीक्षा २५ सप्‍टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने घेतल्‍या जाणार आहेत. यासाठी विविध व्हिडिओ कॉन्‍फरसिंग ॲपचा वापर केला जाईल. परीक्षेची गुणनोंदणी ३० सप्‍टेंबरपर्यंत करायची आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

स्‍वतंत्र वेळापत्रक, कार्यपद्धती जाहीर केली जाणार

दरम्‍यान अंतिम सत्रातील, अंतिम वर्षातील सर्व अभ्यासक्रमांच्‍या नियमित आणि केवळ अंतिम सत्र, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे अनुशेषाचे (बॅकलॉग) पेपर ५ ते ३० ऑक्‍टोबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेतले जातील. यासंदर्भात स्‍वतंत्र वेळापत्रक, कार्यपद्धती जाहीर केली जाणार असल्‍याचे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे. यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्‍या परीक्षांच्‍या तारखांची घोषणा केली आहे. त्‍यापाठोपाठ आता राज्‍यभराचा आवाका असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठानेही परीक्षांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open University Final Year Online Exam in October nashik marathi news