
नाशिक : शिक्षणाची इच्छा असते, परंतु परीस्थिती अभावी किंवा अन्य कारणांनी तंत्रशिक्षणापासून मुकावे लागणारे अनेक विद्यार्थी असतात. तर घ्यायचे तर अभियांत्रिकी शिक्षणच असा काही विद्यार्थ्यांचा निर्धार असतो. अशा दोन्ही स्वरूपाच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावीनंतर पदविका (डिप्लोमा) चा पर्याय उत्तम आहे. नाशिक जिल्ह्यातील पॉलीटेक्नीकमध्ये पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या इतक्या जागा आहेत. वाचा सविस्तर
औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे डिप्लोमा शिक्षणक्रमावर नियंत्रण ठेवले जात असते. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणार्या प्रवेश परीक्षेच्या आधारावर पुढील प्रक्रिया पार पडत असते. परंतु पदविका अभ्यासक्रमाकरीता कुठलीही प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता सध्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. अन्यथा पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांना औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी आहेत. याशिवाय वयाच्या अठराव्या वर्षी पदविका उत्तीर्ण उमेदवार उद्योगकतेची वाट धरू शकतात.
नाशिक जिल्ह्यातील पॉलीटेक्नीकमध्ये पदविका (डिप्लोमा) जागा
स्वतःचा व्यवसाय, उद्योग उभारुन उज्ज्वल करीअर घडवू शकतात. त्यामूळे नोकरी व व्यवसाय-उद्योग असे दोन्ही विकल्प विद्यार्थ्यांपुढे उपलब्ध असतात. याशिवाय शासकीय नोकरीसाठीची पात्रतादेखील मिळविता येऊ शकते. विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांमुळे केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून मुकावे लागत नाही. नाशिक जिल्ह्यातील पॉलीटेक्नीकमध्ये पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या १० हजार २०० जागा आहेत.
प्रवेशाच्या संधी अशा
इयत्ता दहावीत उत्तीर्ण विद्यार्थी तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. याशिवाय बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेतलेले आणि आयटीआयचा विशिष्ट ट्रेड पूर्ण केलेले विद्यार्थी त्या-त्या शाखेस पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षास प्रवेश मिळवू शकतात. तसेच पदविका शिक्षण घेतल्यानंतर अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी थेट द्वितीय वर्षास प्रवेश मिळविता येऊ शकतो. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना https://poly20.dtemaharashtra.org/ या संकेतस्थळावर माहिती व अर्ज भरता येणार आहे.
शासनाच्या विविध योजना उपलब्ध
एससी, एसटी प्रवर्गासह अन्य राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अटी व शर्तींची पूर्तता केल्यास कुठल्याही स्वरूपाचे शुल्क लागत नाही. तर ओबीसी, एसईबीसी प्रवर्गातील उमदेवारांना अर्धे शुल्क लागत असते. एससी, एनटीच्या उमेदवारांनी शासकीय वसतीगृहासाठी अर्ज केल्यास उपलब्ध न झाल्यास राहाणे व खाण्याच्या भत्त्यापोटी शासन निर्धारीत रक्कम अदा करत असते. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह भत्ता योजना उपलब्ध आहे.
पदविका (डिप्लोमा) प्रवेशाचे वेळापत्रक असे
ऑनलाइन नोंदणी, कागदपत्र अपलोड करणे--------------२५ ऑगस्टपर्यंत
ई-स्क्रुटीनी, प्रत्यक्ष स्वरूपात कागदपत्र पडताळणी मुदत-----२५ ऑगस्टपर्यंत
प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार----------------------२८ ऑगस्ट
यादीसंदर्भात हरकती नोंदविण्याची मुदत------------------२९ ते ३१ ऑगस्ट
अंतीम गुणवत्ता यादी जाहीर करणार----------------------२ सप्टेंबर
जिल्ह्यातील तंत्रनिकेतन- २५ उपलब्ध जागा : १० हजार २००
गेल्या काही वर्षांपासून आमच्या पॉलीटेक्नीकच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. याशिवाय आपल्या कल्पकतेच्या जोरावर शिक्षणादरम्यान प्रकल्प साकारले आहेत. हमखास नोकरी, उद्योजकतेची संधी पदविका शिक्षणातून उपलब्ध होत असते. विशेष म्हणजे शासनाच्या योजनांमुळे केवळ आर्थिक परीस्थितीअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबून राहात नाही. - प्राचार्य प्रशांत पाटील, संदीप पॉलीटेक्नीक.
(संपादन - किशोरी वाघ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.