विंचूरच्या सर्पमित्राने शोधल्या सरड्याच्या दोन जाती... संशोधकांना अभ्यासाची संधी  

sarda.jpg
sarda.jpg

नाशिक : जिल्ह्यात जैव विविधता मोठ्या प्रमाणात असून संह्यान्द्रीची उपरांग देखील जिल्ह्यातून गेली आहे.पक्षी,कीटक,सर्प,यांच्या अनेक जाती जिल्ह्यात विविध परिसरात आढळता पण या सर्वांचा अभ्यास नाशिक मध्ये अजून झालेला नाही.नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर या गावा जवळ लासलगाव येथील सर्पमित्र प्रमोद महानुभाव या युवकाने ब्रॉड-हेड फॅन-थ्रोटेड आणि काटेरी डोक्यावरील फॅन-थ्रोटेड  या दोन सरड्याचे जाती पुण्यातील सरीसृप अभ्यासक वरद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधून काढल्या.

नाशिक मध्ये प्रथमच हा सरडा

हा सरडा गुजरात,कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पुणे, मुंबई परिसरात दिसल्याची नोंद असून या सरड्यावर पहिला रिसर्च पेपर २०१६ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.नाशिक मध्ये प्रथमच हा सरडा दिसला असून संशोधकांना अभ्यासाची संधी उपलब्ध झाली आहे. समुद्रसपाटीपासून 1683 ते 3051 फूट उंचीवर, गवत आणि खडकाळ प्रदेशात हे सरडे आढळून येतात. 

मे ते जूनच्या सुरूवातीस ते मादीस आकर्षित करतात
 या सरड्याच्या खालच्या जबडावर निळ्या पट्ट्यासह किंचित दाबलेले, मध्यम आकाराचे, पांढर्‍या रंगाचे ओव्हलॅप दिसतो.. मे,जून आणि ऑगस्ट दरम्यान नर दगडांवर पिवळा पंखा बाहेर काढून मादीला आकर्षित करण्या बरोबर दुसऱ्या नराला टेरीटरी मध्ये न येण्यासाठी देखील तो प्रयत्न करीत असतो. 
 दुसऱ्या प्रजातीचे नाव  नाव लॅटिन शब्द "स्पायने", ज्याचा अर्थ "रीढ़" आहे आणि ग्रीक शब्द "सेफ्लस", ज्याचा अर्थ "डोके" आहे. हे त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस वाढविलेले, मणक्याचे आकर्षित दर्शवते. हे गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या सखल प्रदेशात आणि उच्च उंचस्थानामध्ये गवताळ प्रदेशात आणि खडकांवर टेकडीमध्ये आढळून येतात. मे ते जूनच्या सुरूवातीस ते मादीस आकर्षित करीत असतात. प्रदर्शन करतात.

स्वेच्छेने पाठिंबा दर्शविला

भारत हा एक प्रजाती-आधारित बायोइन्फॉर्मेटिक्स प्लॅटफॉर्म आहे ज्यास नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, इंडियन फाउंडेशन फॉर बटरफ्लायज, डायव्हर्सिटी इंडिया, आणि टिटली ट्रस्ट यासारख्या असंख्य संस्थांनी स्वेच्छेने पाठिंबा दर्शविला आहे. हे व्यासपीठ उष्णकटिबंधीय विकसनशील देश आणि भारत सारख्या जैवविविधता हॉटस्पॉट्समधील जैवविविधता डेटा एकत्रित करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी आणि विश्लेषणासाठी बनवले गेले आहे. आता पर्यंत भारतातील कोरड्या भागात पाच नवीन प्रजाती फॅन-थ्रोटेड सरडे सापडले आहे. या सरड्या वर अभ्यास होणे आवश्यक असून विंचूर परिसरात आणखी सरड्याच्या जाती सापडण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे 

सरड्याची नाशिक मधील पहिली नोंद

 गेल्या दहा वर्षा पासून मी सर्प पकडतो. पुण्यातील सरीसृप अभ्यासक वरद गिरी यांनी मला या परिसारत सरडे  कसे शोधावे याचे मार्गदर्शन केले.गेली तीन महिने मी ते शोधत होतो.यासाठी नेचर क्लब ऑफ नाशिक ने देखील सहकार्य केले. त्यामुळेच मला विंचूर परिसरात दोन जाती शोधता आल्या.या सरड्याची नाशिक मधील पहिली नोंद असून याच्यावर अभ्यास होणे आवश्यक आहे- प्रमोद महानुभाव, सर्पमित्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com