
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. १३) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. वसंत गिते व सुनील बागूल यांनी भाजपला केलेला रामराम व माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पक्षात पुर्नगामनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
नाशिक : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. १३) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. वसंत गिते व सुनील बागूल यांनी भाजपला केलेला रामराम व माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पक्षात पुर्नगामनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
भव्य स्वागताची तयारी
फडणवीस यांचे दुपारी शहरात आगमन होईल. भाजपतर्फे पाथर्डी फाटा येथे ढोलताशांच्या गजरात भव्य स्वागत केले जाणार आहे. फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी दुपारी दोनला माजी संघटनमंत्री नाना नवले यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन होईल. दुपारी साडेतीनला पत्रकार संघाच्या पुरस्काराचे वितरण, तर सांयकाळी साडेपाचला देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन होणार आहे.
हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा
दौऱ्याच्या नियोजनसांदर्भात भाजपच्या ‘वसंत स्मृती' कार्यालयात बैठक झाली. महापौर सतीश कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, शहर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, आमदार राहुल ढिकले, प्रदीप पेशकार, महापालिका सभागृह नेते सतीश सोनवणे, सुहास फरांदे, पवन भगूरकर, सुनील केदार, स्वाती भामरे, आध्यत्मिक आघाडी प्रदेश संयोजक तुषार भोसले, पंचवटी प्रभाग सभापती शीतल माळोदे, कोमल मेहरोलिया, ॲड. श्याम बडोदे आदी उपस्थित होते.
हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात
फडणवीस काय बोलणार?
सानप यांचा भाजपमध्ये पुर्नप्रवेश झाल्यानंतर पक्षाची ताकद वाढल्याचे बोलले जात असतानाच, शिवसेनेने वसंत गिते व सुनील बागूल यांना शिवसेनेत प्रवेश देऊन परतफेड केली आहे. श्री. गिते यांचे पुत्र प्रथमेश पहिल्याच टर्ममध्ये उपमहापौर होते, तर सुनील बागूल यांच्या मातोश्री भिकुबाई बागूल विद्यमान उपमहापौर आहेत. या पार्श्वभूमीवर गिते व बागूल यांनी प्रवेश केल्याने फडणवीस काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.