esakal | आश्चर्यच! मालेगावमधील चमत्काराची चर्चा होताच.. परजिल्ह्यातील संशयितांची एंट्री!
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon 123.jpg

मालेगाव हे कष्टाळू नागरिकांचे गाव. लॉकडाउनमुळे त्यांना घरात थांबावे लागले. त्याचाही परिणाम संसर्ग वाढण्यात झाला. यंत्रमाग सुरू झाले अन्‌ चमत्कार वाटावा असा बदल घडला. संपूर्ण देशभर चर्चेत आलेल्या मालेगाव शहरातील कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होता. पण त्यात असे काही घडले ज्याने सर्वांनाच आश्चर्य झालयं

आश्चर्यच! मालेगावमधील चमत्काराची चर्चा होताच.. परजिल्ह्यातील संशयितांची एंट्री!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : मालेगाव हे कष्टाळू नागरिकांचे गाव. लॉकडाउनमुळे त्यांना घरात थांबावे लागले. त्याचाही परिणाम संसर्ग वाढण्यात झाला. यंत्रमाग सुरू झाले अन्‌ चमत्कार वाटावा असा बदल घडला. संपूर्ण देशभर चर्चेत आलेल्या मालेगाव शहरातील कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होता. पण त्यात असे काही घडले ज्याने सर्वांनाच आश्चर्य झालयं. यावर आता प्रशासकीय यंत्रणा व वैद्यकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, त्याचे विश्‍लेषण केले जात आहे.

कोरोनामुक्तीच्या पॅटर्नचीच चर्चा

मालेगाव शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. खासगी रुग्णालये सुरू झाल्यानंतर मृत्यूचा आलेख शून्यावर आला. कोरोनाबाधितांचा मृत्यूही झाला नाही. स्थानिक पातळीवरील होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी उपचार व होमिओपॅथीचे घरीच होणाऱ्या उपचारामुळे कोरोनामुक्तीचा मालेगाव पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू झाली. ही चर्चा ऐकून परजिल्ह्यातील काही संशयित रुग्ण शहरातील नातेवाइकांकडे आल्याची माहिती मिळाल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. 

पॅटर्नमुळे परजिल्ह्यातील संशयित मालेगावात 

महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार व आरोग्य प्रशासनानेही याच पद्धतीचे आवाहन केल्याने येथे शहराबाहेरील काही रुग्ण नातेवाइकांकडे आल्याची चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर निर्बंध व नाकाबंदीही काहीशी सैल झाली. त्याचाच फायदा घेत जळगाव, औरंगाबाद, मुंब्रा, भिवंडी, ठाणे येथील काही संशयित शहरात नातेवाइकांकडे उपचार व आश्रयाला आले आहेत. त्यामुळे शहराच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. या संशयितांच्या शोधासाठी आरोग्य विभागाला नवीन मोहीम सुरू करावी लागते की काय, याचीच चर्चा आहे.

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

पॅटर्न अंगाशी येतो की काय?

कोरोनामुक्तीचा झालेला गवगवा व पॅटर्न अंगाशी येतो की काय, यामुळे शहर व परिसरात कोणी अनोळखी अथवा अन्य शहरातील नागरिक आढळून आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण