यंदा भात पीक कायमच संकाटात; आता करपा रोगाचा प्रादुर्भावाने शेतकरी चिंतेत

Outbreak of Karpa disease on rice crop in Igatpuri nashik marathi news
Outbreak of Karpa disease on rice crop in Igatpuri nashik marathi news

नाशिक/खेडभैरव : इगतपुरी तालुक्यासह देवळे, पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, टाकेद, खेड आदी परिसरातील भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने येथील भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. 
सुरवातीला पाऊसच न झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांची भातरोपे खराब होऊन वाया गेली. नंतर पाऊस सुरू झाला पण कमी कालावधीत प्रचंड पाऊस झाल्याने कशीबशी शेतकऱ्यांनी भातलागवड केली. त्यामुळे पुन्हा जास्त पाण्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले.

तातडीने पंचनामे करण्याची मागणी

सध्या इंद्रायणी, १००८, पूनम, सोनम, ओम श्रीराम, गरे, हाळे अशा विविध भातवाणांची लागवड केली पण काही दिवसांपासून लागवड केलेली भातपिके पिवळी पडू लागली असून, त्यावर सुकवा व करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भात उत्पादक शेतकरी या वर्षी अनेक अडचणींत असताना आता करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला आहे. कृषी विभागाने उपाययोजना कराव्यात व शासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी येथील शेतकरी प्रकर्षाने करत आहेत. 

 
पावसाला उघडीप मिळाल्याने भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. करपा नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून ग्रामस्तरावर उपाययोजनांसंदर्भात मार्गदर्शन सुरू आहे. 
-शीतलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी 

भात पिकाचे पोषण होण्याचा हा कालावधी होता मात्र भात पिकावर करपा रोगामुळे पिके पिवळी पडत आहेत. आधीच यंदा भात पीक संकटात असताना आता करपा रोगामुळे नुकसान होत आहे. शासनाने तातडीने पंचनामे करावेत. 
-मच्छिंद्र मधे, शेतकरी, खेडभैरव, ता. इगतपुरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com