esakal | जळगाव नेऊरच्या पैठणी हबचा जिल्ह्यात बोलबाला! कोरोनाचे संकट पेलवत व्यावसायिक सज्ज 
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon neur paithni.jpg

जळगाव नेऊर येथील पैठणी हबमधील तरुण पैठणी व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. आता हा फटका सहन करून पुन्हा नव्या उमेदीने पैठणी व्यवसाय पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

जळगाव नेऊरच्या पैठणी हबचा जिल्ह्यात बोलबाला! कोरोनाचे संकट पेलवत व्यावसायिक सज्ज 

sakal_logo
By
अरुण मलाणी

मुखेड (जि.नाशिक) : जळगाव नेऊर (ता. येवला) येथे साकारलेल्या पैठणी हबचा अल्पावधीत जिल्हाभरात बोलबाला झाला आहे. आता दसरा-दिवाळी सणासाठी लागणाऱ्या आकर्षक साड्या व पैठणी विक्रीसाठी येथील पैठणी दालने सज्ज झालेली आहेत. 

जळगाव नेऊरच्या पैठणी हबचा जिल्ह्यात बोलबाला 
अल्पावधीतच जळगाव नेऊरने पैठणीच्या विक्रीत आपली वेगळी ओळख तयार केली आहे. त्यामुळे परदेशी पर्यटक, सिनेकलाकार व परजिल्ह्यातील मोठा ग्राहक वर्ग येथे महागड्या पैठण्या व साड्यांची खरेदी करण्यासाठी येत असतो हे येथील पैठणी हबचे वैशिष्ट्य आहे. येवल्यानंतर पैठणी व्यवसायासाठी जळगाव नेऊर येथील पैठणी उद्योगसमूहाची भरभराट सातासमुद्रापार गेली. ऐन लग्नसराईच्या प्रारंभी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे पैठणी शोरूम कुलूपबंद ठेवावे लागले होते. त्यामुळे जळगाव नेऊर येथील पैठणी हबमधील तरुण पैठणी व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. आता हा फटका सहन करून पुन्हा नव्या उमेदीने पैठणी व्यवसाय पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोरोनाचे मोठे संकट पेलत पैठणी व्यावसायिकांना आपला व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी दसरा, दिवाळी सणाबरोबर लग्नसराईची आस लागून आहे. दीपावलीनिमित्त तसेच लग्नबस्त्यासाठी पैठणी खरेदी महोत्सवाची धूम ग्राहकांना अनुभवायला मिळणार आहे. 

तरुण व महिलांना हक्काचा रोजगार 
जळगाव नेऊरची पैठणी दालने, हॅण्डलूम, मार्केटिंग, आधारित व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास पाचशे गरजू, होतकरू तरुण व महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध होऊन जगण्याची दिशा मिळाली. नाशिक, पुणे, मुंबईसारख्या शहरांत असणारी आलिशान दालनांसारखी दालने व शोरूम जळगाव नेऊर पैठणी हबमध्ये दिमाखात उभी राहिली आहेत. 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

व्यावसायिक सज्ज 
सण व लग्नसराईनिमित्त येथील संस्कृती पैठणीचे गोविंद तांबे, सोमनाथ तांबे, सौभाग्य पैठणीचे संतोष राजगुरू, राहुल राजगुरू, कलादालन पैठणीचे मेघश्‍याम ठोंबरे, पोपट शिंदे, कलासंस्कृती पैठणीचे दत्तू वाघ, तुकाराम रेंढे, रेशीमबंध पैठणीचे संदीप तनपुरे, राहुल शेळके, थोरात पैठणीचे प्रमोद थोरात, कैलास गायकवाड, लावण्य पैठणीच्या प्रतिभा काळे, आकाश ठोंबरे, मनीषा कोठूरकर, महालक्ष्मी पैठणीचे विशाल शिखरे, दत्तू रेंढे, राहुल राजगुरू, नवरंग पैठणीचे प्रदीप शिंदे, सुरेश शिंदे, साई माउली पैठणीचे प्रकाश ऊर्फ (पप्पू) शिंदे आदी पैठणी उत्पादक व विक्रेते सज्ज आहेत. 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश
 
हायटेक झाले आदरातिथ्य 
जळगाव नेऊर येथील पैठणी हबमधील प्रत्येक पैठणी दालनामध्ये परदेशी पर्यटक, सिनेअभिनेते, आमदार, खासदार, मंत्री, राजकीय नेते, पदाधिकारी, अधिकारी येतात. येथे आल्यावर प्रत्येकाचे आदरातिथ्य आकर्षक शेला देऊन केले जाते. 

संपादन - ज्योती देवरे

go to top