गुरूजी, शाळा कधी सुरू होणार? विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ग्रामीण भागात पालक अस्वस्थ

school
school

नाशिक/इगतपुरी : गुरुजी! शाळा कधी सुरू होणार आहे ? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून शिक्षकांना विचारला जात आहे शाळेप्रती आपुलकी व जिव्हाळा दाखवणारा हा प्रश्न यंदा शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास चार महीने पुर्ण होत आले मात्र विद्यार्थ्यांना अजूनही शाळा प्रवेशबंदी कायम आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षण बंद असल्याने विद्यार्थी बिनधास्त मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याने पालक अस्वस्थ झाले आहेत.

पालकांची ऑफलाईनला पसंती

तालुकाभरातील शेकडो विद्यार्थी तथा पालकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन कोरोनाने बंद असलेली शाळा पुन्हा सुरू झाल्यास आपण आपल्या पाल्यास शाळेत पाठवायला तयार आहात का यावर वातार्लाप केला असता विद्यार्थी, पालकांनी अगदी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झालेला कोरोना लॉकडॉऊन दिवसेंदिवस अनलॉक होत असला तरी शाळा त्याला अपवाद ठरत आहे. एकूणच आजघडीला विद्यार्थ्यांना तब्बल पाच महिन्यांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत. भविष्यात सुट्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी परिस्थिती नाही. यादरम्यान विद्यार्थी शाळेतील शिक्षणापासून दूर आहेत. ऑनलाईन शिक्षण चालू आहे पण त्यात ग्रामीण विद्यार्थी, पालक भरडले जात आहेत. वास्तवात पालक केवळ आणि केवळ ऑफलाईनला पसंती देत आहेत.

विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल काळजी​

शाळा बंद होऊन तब्बल दीडशे दिवसांचा कालावधी झाला आहे. आता विद्यार्थ्याला शाळेत जाण्याची उत्सुकता आहे पालक सुद्धा सकारात्मक दिसून येतात. पण कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा कधी सुरू होणार हे अनिश्चित आहे.त्यातच संचारबंदी असल्याने बिनधास्त गावाबाहेर नातेवाईकांना भेटायला जाणे शक्य नाही. मुले-मुली घरच्या घरी खोडकरपणा करण्यात, खेळण्यात इतके बेभान झालेत कि ते आता आई-बाबा, आजी-आजोबा यांना ऐकत नाही अशा तक्रारी वाढू लागल्यात.परिणामी पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली आहे. गावात,रस्त्यात, घराजवळ शिक्षक दिसताच विद्यार्थी सर, शाळा कधी सुरू होणार ? असा प्रश्न करीत आहे.

शेतीच्या कामांमुळे ऑनलाईन शिक्षणात खोडा

कोरोनामुळे शाळांमधील वर्ग प्रत्यक्ष भरणे बंद आहे.त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न शाळांकडून सुरू आहे मात्र तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इंटरनेटची गती नसल्याने ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत अडचणी येत आहे. त्यातच आता विविध भागात शेतीची व सोंगणीची कामे सुरु झाल्याने त्या कामांना पालकवर्ग प्राधान्य देत असल्याामुळे ऑनलाईन शिक्षणात विविध अडचणी येत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com