तबलिगी मरकजमध्ये सहभागी झालेल्यांनी त्वरित माहिती द्या...अन्यथा...

markaj.jpg
markaj.jpg

नाशिक : कोरोना संसर्गासंदर्भात परिस्थिती नियंत्रणात असलेल्या नाशिकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दुसरा रुग्ण आढळल्याने प्रशासन हादरले आहे. पॉझिटिव्ह दुसरा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झालेला असल्याने या कार्यक्रमाला गेलेल्या नाशिकमधील नागरिकांनी स्वतःहून माहिती द्यावी, न दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (ता. 6) दिला. 

स्वतःहून लोक पुढे येत नसल्याने महापालिकेच्या वतीने जाहीर आवाहन
दिल्ली येथील निजामुद्दीन भागात 12 ते 15 मार्चदरम्यान तबलिगी मरकज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील काही व्यक्ती कोविड-19 आजाराचे रुग्ण आढळल्याने देशभर चिंता व्यक्त केली जात आहे. मरकजच्या कार्यक्रमाला गेलेल्या व्यक्तींची यादी प्रशासनाच्या हाती लागली. त्यानुसार बहुतांश व्यक्ती महापालिकेच्या वैद्यकीय पथकाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या वतीने कोविड-19 तपासणीसाठी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आला असून, तपोवनातदेखील विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मरकज कार्यक्रमातून आलेल्या लोकांचा अद्यापही शोध घेतला जात आहे. अद्यापही अनेक लोक या कार्यक्रमाला हजर होते; परंतु त्यांची माहिती समोर येत नाही. कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांची तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु स्वतःहून असे लोक पुढे येत नसल्याने महापालिकेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले. दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नाशिक शहरातील अथवा शहरात वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनी महालिकेच्या कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय (0253-2595049) येथे तपासणीसाठी संपर्क साधावा. 

VIDEO : Breaking : नाशिकमध्ये दुसरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह...जिल्हाधिकारीं कडून माहिती
तपासणी न झालेली व्यक्ती आढळून आल्यास अथवा अशा व्यक्तींची माहिती लपविल्यास संबंधितांविरोधात साथरोग अधिनियम 1897, भारतीय दंड कलम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. - राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com