नाशिककरांनो काळजी घ्या! कोरोना पाठोपाठ 'सारी'ची भीती; २४७२ रुग्णांपैकी ६१९ बाधित

विक्रांत मते
Wednesday, 28 October 2020

मोहिमेअंतर्गत रक्तदाब, मधुमेह, हृदरोग यासारखे अन्य आजारांचे रुग्ण तपासण्याची जबाबदारी शिक्षक, आरोग्य सेवकांना देण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हा या मोहिमेचे प्रमुख उद्देश होता. कोरोनाचे रुग्ण शोधत असताना मोठ्या प्रमणात मधुमेह, रक्तदाब, ह्दयरोगाचे रुग्ण आढळले. 

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरात सुरु असलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेत कोरोनाचे रुग्ण शोधत असतानाच कोरोना सारखीच लक्षणे असलेल्या सारी आजाराचे रुग्ण आढळून येवू लागल्याने वैद्यकीय विभागासमोरची डोकेदुखी वाढली असून आतापर्यंत २,४७२ संशयितांपैकी ६१९ सारी आजाराने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कोरोना रुग्णांसोबतच आढळले इतर रुग्ण

कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरात दुसया टप्पा पार पडत असताना ४ लाख ७० हजार घरांमध्ये १८ लाख ३६ हजार ८०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. मोहिमेअंतर्गत रक्तदाब, मधुमेह, हृदरोग यासारखे अन्य आजारांचे रुग्ण तपासण्याची जबाबदारी शिक्षक, आरोग्य सेवकांना देण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हा या मोहिमेचे प्रमुख उद्देश होता. कोरोनाचे रुग्ण शोधत असताना मोठ्या प्रमणात मधुमेह, रक्तदाब, ह्दयरोगाचे रुग्ण आढळले. 

सारी आजाराची लक्षणे

शासनाने सारी या आजाराचे रुग्ण शोधण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यानुसार २,४७२ सारीचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यातील ६१९ जणांना सारी आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आजाराच्या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सारी आजाराची लक्षणे कोरोना, डेंगी, स्वाईन फ्ल्यु प्रमाणेचं आहेत. यात श्‍वास घेण्यास त्रास होणे, ताप,सर्दी व खोकला येणे, फुफुस्सांमध्ये सुज येणे हि लक्षणे आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

सारी हा आजार संसर्गजन्य आहे. सारी आजार अंगावर काढू नये, धापा लागल्यासारखा दम लागल्यास तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे. - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patients with sari diseases after corona is increasing in the city nashik marathi news