अतिसंवेदनशील ठिकाणी नाशिक रोडला पेट्रोलिंग; गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस सतर्क  

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Thursday, 5 November 2020

गुन्हेगारांवर जरब बसावा, यासाठी नाशिक रोड पोलिसांनी विशिष्ट परिसरात पेट्रोलिंगसह नजर ठेवणे सुरू केले आहे. महिनाभरातील गुन्हेगारीच्या घटनांचा विचार केला असता, तलवार, कोयते गॅंग तसेच गावठी कट्टा बाळगणारी गॅंग सध्या संघटित गुन्हेगारी करीत आहे. ही संघटित गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस सतर्क आहेत.

नाशिक रोड : गुन्हेगारांवर जरब बसावा, यासाठी नाशिक रोड पोलिसांनी विशिष्ट परिसरात पेट्रोलिंगसह नजर ठेवणे सुरू केले आहे. महिनाभरातील गुन्हेगारीच्या घटनांचा विचार केला असता, तलवार, कोयते गॅंग तसेच गावठी कट्टा बाळगणारी गॅंग सध्या संघटित गुन्हेगारी करीत आहे. ही संघटित गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस सतर्क आहेत.

संघटित गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस सतर्क

कॅनल रोडची तीन किलोमीटरवर असलेली झोपडपट्टी, राजवाडा, गुलाबवाडी, गुलजारवाडी, गोरेवाडी, पवारवाडी, फर्नांडिसवाडी, स्वप्नील बिल्डिंग, रोकडोबावाडी, देवळालीगाव, अरिंगळे मळा, सिन्नर फाटा, मंगलमूर्तीनगर, भीमनगर स्टेशनवाडी, रेल्वे स्थानकाच्या आसपासचा परिसर, डोबी मळाजवळील मोकळ्या जागा, विहितगाव, देवळालीगाव यांच्यामध्ये असणाऱ्या झोपडपट्ट्या परिसरात पोलिस पेट्रोलिंग करीत आहेत. नाशिक रोड येथे सध्या कट्टा विकणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे. सिन्नर फाटा परिसरात असणाऱ्या अरिंगळे मळा, फर्नांडिसवाडी, स्वप्नील बिल्डिंग, गंधर्वनगरी, रोकडोबावाडी येथून आजपर्यंत गावठी कट्ट्यासह संशयितांना अटक करण्यात आली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

पोलिस आयुक्त शनिवारी नाशिक रोडला 
पोलिस आयुक्त शनिवारी (ता. ७) नाशिक रोड येथे भेट देणार असून, त्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग वाढल्याचे बोलले जात आहे. नाशिक रोडला गुन्हेगारीचा वाढते प्रमाण चिंतनीय बाब असून, सराफ व्यावसायिकांसह लहान-मोठे व्यापारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन समस्या मांडणार आहेत.  

हेही वाचा >  ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patrolling on Nashik Road in sensitive places nashik marathi news