जनता कर्फ्यु आदेशाचे पालन करत निघाली अंत्ययात्रा! अवघ्या चार खांद्यांनीच केला अंत्यविधी..

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.22) देशभर पाळल्या जाणाऱ्या "जनता कर्फ्यू'साठी नाशिकमध्ये सर्व सज्जता ठेवण्यात आली. हा कर्फ्यू कायद्यानुसार बंधनकारक नसला तरी परिस्थितीनुसार अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार या काळात बंद होते.

नाशिक / सिडको : मोरवाडी गाव या ठिकाणी (ता.२२) वयोवृद्ध राजेंद्र प्रभाकर देशमुख वय 67 यांचे निधन झाले. या ठिकाणी योगेश ( बाळा ) दराडे यांनी तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले तसेच शासनाचे आदेश पाळण्याचे आवाहन केले. नागरिकांनी प्रतिसाद देत कुठलीही गर्दी न करता सहकार्य केले. दराडे यांनी  स्वतः अंतिम विधीची संपूर्ण तयारी करून अवघ्या  चार खांदेकरीमध्ये अंतिम विधी पाडला. त्यावेळी त्यांच्यासोबत सोपान सानप व मयत व्यक्तीची पत्नी व दोन मुले उपस्थित होते.

"जनता कर्फ्यू'साठी नाशिकमध्ये सर्व सज्जता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.22) देशभर पाळल्या जाणाऱ्या "जनता कर्फ्यू'साठी नाशिकमध्ये सर्व सज्जता ठेवण्यात आली. हा कर्फ्यू कायद्यानुसार बंधनकारक नसला तरी परिस्थितीनुसार अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार या काळात बंद होते.

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

विनाकारण गर्दी करून संसर्ग वाढीला मदत ठरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका शनिवार (ता. 21) सायंकाळपासूनच सुरू झाला होता. केंद्र सरकारने स्थानिक प्रशासनाला साथरोग प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे आधिकार दिले. सरकारी, निमसरकारी, खासगी यंत्रणाही या आवाहनानुसार सज्ज झाल्या आहेत. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people followed the funeral procession following the curfew order Nashik Marathi News