esakal | आश्चर्यच! आरोग्याबद्दल लोकांचे डॉक्टरऐवजी गुगलला प्राधान्य; एकतृतीयांश जणांचा व्हाॅट्सॲपवर विश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

People prefer Google to doctors for health

‘आपण निरोगी आहोत’ अशी समजूत असणाऱ्यांपैकी ३८ टक्के भारतीय मधुमेही आहेत, असे या सर्वेक्षणात आढळून आले, तर २८ टक्के निरोगी व्यक्ती त्यांच्या एचबीए१सी लेव्हलनुसार प्री-डायबेटिक असल्याचे निदान झाले आहे. 

आश्चर्यच! आरोग्याबद्दल लोकांचे डॉक्टरऐवजी गुगलला प्राधान्य; एकतृतीयांश जणांचा व्हाॅट्सॲपवर विश्वास

sakal_logo
By
प्रशांत कोतकर

नाशिक : लोकांचा हृदयाच्या आरोग्यविषयीचा दृष्टिकोन आणि प्रत्यक्षात हृदयरोगाचा धोका असलेल्या लोकांची वास्तविक संख्या यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी प्रश्नावलीवर आधारित मुलाखती आणि एचबीए१सी (सरासरी शर्करा स्तर) आणि लिपिड प्रोफाइल टेस्ट्स. ‘मेकिंग इंडिया हार्टस्ट्रॉन्ग सर्व्हे’ देशभरातील प्रथम व द्वितीय श्रेणीतील शहरात करण्यात आला आहे.

यात आरोग्याबाबत डॉक्टरऐवजी गुगलला प्राधान्य देण्यात असल्याची भयावह बाब पुढे आली. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब किती जोखमीचा ठरू शकतो, याबाबत जागरूकतेचा अभाव असल्याचेही दिसून आले. 

 ३८ टक्के भारतीय मधुमेही

‘आपण निरोगी आहोत’ अशी समजूत असणाऱ्यांपैकी ३८ टक्के भारतीय मधुमेही आहेत, असे या सर्वेक्षणात आढळून आले, तर २८ टक्के निरोगी व्यक्ती त्यांच्या एचबीए१सी लेव्हलनुसार प्री-डायबेटिक असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी दोनतृतीयांश व्यक्तींना एकतर हृदय आणि रक्तवाहिन्यांचा आजार आहे किंवा त्याचा धोका आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाब हा हृदयरोगाला कारणीभूत ठरू शकणारा घटक असू शकतो, याची जाणीव नाही. नाशिक शहरात ही चिंता सर्वांत, तर दुसरे द्वितीय श्रेणीतील शहर असलेल्या विजयवाड्यामध्ये हे प्रमाण सर्वांत जास्त (८१ टक्के) आहे.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

सर्वेक्षणात समोर आलेल्या बाबी

सर्वेक्षणात निर्दशनास आलेली चांगली बाब म्हणजे यामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ५० टक्के लोकांना असे वाटते, की नियमितपणे शारीरिक काम आणि निरोगी आहारामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका टाळला जाऊ शकतो. मदुराई शहरात हे प्रमाण ५५ टक्के म्हणजे सर्वांत जास्त आहे. नाशिकमध्ये ते सर्वांत कमी फक्त २५ टक्के आहे. निराशाजनक बाब अशी की, डॉक्टरकडे नियमितपणे जाणे गरजेचे आहे, असे फक्त १७ टक्के भारतीयांना वाटते. अजून जास्त दुर्दैवाची गोष्ट अशी की, ५९ टक्के लोक आरोग्याबाबत माहिती घेण्यासाठी किंवा डॉक्टरकडे जावे अथवा नाही किंवा आरोग्यविषयक तपासण्या करून घ्याव्यात की नाही, असे तब्येतीबद्दल निर्णय घेण्यासाठी गुगलवर अवलंबून असतात. याहीपेक्षा वाईट बाब अशी, की एकतृतीयांश लोक व्हाॅट्सॲपवरील माहितीवर विश्वास ठेवतात. 


शुद्ध रक्तवाहिन्या टणक होण्याच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. खासकरून युवा पिढीची बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी यामुळे त्यांच्या बाबतीत हा आजार बळावत आहे. संशोधनातून असे निदर्शनास आले आहे, की शुद्ध रक्तवाहिन्या टणक होण्याशी संबंधित कोरोनरी स्टेनोसिसमुळे जवळपास ३० टक्के लोक आजारी आहेत. असे आजार आपल्याला होऊ नयेत, यासाठी जीवनशैलीत योग्य ते बदल घडवून आणणे ही काळाची गरज बनली आहे. 
- डॉ. मनोज चोपडा, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, मॅग्नम हार्ट इन्स्टिटयूट (नाशिक) 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मधुमेह ही मोठी साथ बनेल, अशी गंभीर स्थिती असलेल्या देशात लोक अजूनही मधुमेहाविषयी अनभिज्ञ आहेत, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे, की मधुमेह बरा होत नाही. परंतु व्यवस्थापनामार्फत त्यावर नियंत्रण ठेवता येते, त्यासाठी आरोग्यदायी खाणे आणि नियमितपणे शारीरिक व्यायाम आवश्यक आहे.  - डॉ. यशपाल गोगटे,  कन्सल्टन्ट एंडोक्रिनॉलॉजिस्ट, हार्मोनी हेल्थ क्लब (नाशिक) 

 
सर्वेक्षणात आढळून आलेल्या इतर बाबी 

- नाशिकमधून या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४१ टक्के व्यक्तींना असे वाटते, की उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी निरोगी अन्न खाणे गरजेचे आहे. इतर शहरांमध्ये या जागरूकतेचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. चेन्नई- ४० टक्के, मदुराई- ३७, मुंबई- ३१, हैदराबाद- १२ आणि विजयवाडा- आठ. 

- नाशिकमधून या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ७४ टक्के व्यक्तींना माहिती आहे, की अनसॅच्युरेटेड फॅट हे ट्रिग्लायसेराईडचे प्रमाण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. इतर शहरांमध्ये या जागरूकतेचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. मदुराई व विजयवाडा- ६०, हैदराबाद- ५९ आणि मुंबई- ५७. 

- मुंबई व नाशिकमधून या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी फक्त एक टक्के लोकांना माहिती आहे, की लिपिड स्तर नियंत्रणात राखल्याने युवा व्यक्तींना हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. या विभागात चेन्नईमध्ये या जागरूकतेचे प्रमाण सर्वाधिक १७ टक्के आहे.

go to top