पेस्ट कंट्रोल ठेक्यात 'शिवसेने'ची भूमिका संशयात...वाचा नेमके काय घडले?

shivsena bjp.jpg
shivsena bjp.jpg
Updated on

नाशिक : कुठल्याही कामाला मुदतवाढ द्यायची असेल, तर तीन महिन्यांपेक्षा अधिक मुदतवाढ देता येत नाही. परंतु पेस्ट कंट्रोलच्या कामाला वर्षभरापासून मुदतवाढ देताना तब्बल एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षाच्या स्थायी समितीतील शिवसेना सदस्याच्या एका पत्राचा आधार घेतल्याने पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका संशयात सापडली आहे. 

पत्राद्वारे एक वर्षाची मुदतवाढ 

शहरात औषध फवारणी करण्यासाठी पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला जातो. वास्तविक, ठेका देताना स्पर्धा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निविदाप्रक्रिया राबविणे गरजेचे असताना स्थानिक पातळीवर सेटलमेंट करून ठेका दिला जात असल्याचे पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यावरून समोर आले आहे. या वर्षी ठेका वादात सापडला आहे. वास्तविक, १९ कोटी रुपये ठेक्याची मूळ किंमत ३३ कोटींवर पोचविली गेली. ही रक्कम कमी म्हणून की काय, पुढील तीन वर्षांत डिझेलची किंमत दीडशे रुपये प्रतिलिटरवर पोचेल, असे गृहीत धरून व ११४ अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, ग्रॅच्युएटी व भविष्यनिर्वाह निधीची रक्कम एकत्रित करून ४७ कोटींवर ठेका नेला. निविदा समितीने ठेक्याची रक्कम बघून नकारात्मक शेरा ओढल्यानंतर आयुक्तही सावध झाले. परंतु वैद्यकीय विभागात खरेदीचे अधिकार दिलेल्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णाची सेवा करण्याऐवजी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यातून मलिदा लाटण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात सत्ताधारी भाजपकडून पाठबळ मिळत आहे. 

भाजपवर आरोप करणारी शिवसेना वादाच्या भोवऱ्यात

शिवसेनेचे नगरसेवक संतोष साळवे यांनी गेल्या वर्षी स्थायीला एक पत्र दिले. त्यात दिग्विजय एंटरप्राइजेसला काम देणे कसे योग्य आहे व मुदतवाढ न दिल्यास महापालिकेचे आर्थिक नुकसान कशा प्रकारे होईल, याचा संदर्भ पत्रात आहे. त्या आधारे तीन व सहा महिने नव्हे, तर तब्बल एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याने महापालिकेत भाजपवर आरोप करणारी शिवसेना वादात सापडली आहे. 

भाजप-सेनेचे साथ-साथ 

दिग्विजय एंटरप्राइजेसला पुढील तीन वर्षांसाठी तेही तब्बल १४ ते १५ कोटींची अतिरिक्त वाढ करून देताना भाजपच्या नगरसेवकांचा रेटा वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र गेल्या वर्षी मुदतवाढ देताना शिवसेनेने घेतलेली भूमिका भाजपपाठोपाठ वादात सापडली आहे. भाजप व शिवसेना पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात बरोबर तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.  

(संपादन - किशोरी वाघ)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com