मध्यरात्रीचा खेळ! तब्बल २५ ते ३० दुचाकींचे कॉक तोडून पेट्रोल चोरी; वाहनधारकांमध्ये संताप

प्रमोद दंडगव्हाळ
Wednesday, 7 October 2020

कोरोना संकट काळात घरफोडी, सोनसाखळी, मोबाईल चोरी असे प्रकार दिसून येत असताना चोरट्यांकडून आता पेट्रोल चोरी केली जात आहे. तब्बल २५ ते ३० दुचाकींचे पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे बाहेर लावलेली वाहने आता घरात लावायची का, असा प्रश्न वाहनधारकांकडून विचारला जात आहे. 

नाशिक / सिडको : कोरोना संकट काळात घरफोडी, सोनसाखळी, मोबाईल चोरी असे प्रकार दिसून येत असताना चोरट्यांकडून आता पेट्रोल चोरी केली जात आहे. तब्बल २५ ते ३० दुचाकींचे पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे बाहेर लावलेली वाहने आता घरात लावायची का, असा प्रश्न वाहनधारकांकडून विचारला जात आहे. 

दुचाकींचे कॉक तोडून पेट्रोल चोरी
तोरणानगर व सावतानगर परिसरात गल्लीबोळात असलेल्या तब्बल २५ ते ३० दुचाकींचे पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.प्रभाग २९ येथील तोरणानगर परिसरात रविवारी (ता. ४) मध्यरात्री चोरट्यांनी तब्बल २५ ते ३० दुचाकींचे कॉक तोडून पेट्रोल चोरी केले. एकाच वेळी अनेक दुचाकीतील शेकडो लिटर पेट्रोलची चोरी चोरट्यांनी झाली असून, पेट्रोलचे कॉक, नळ्याही तोडून टाकले. सकाळी कामावर जाताना नागरिकांना हा प्रकार लक्षात आला.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

पोलिस ठाण्यात वारंवार संपर्क साधला

परिसरातील अनेक दुचाकींमधून पेट्रोल चोरी झाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. नागरिकांनी अंबड पोलिस ठाण्यात वारंवार संपर्क साधूनही घटनास्थळी पोलिस आले नाहीत. पोलिस या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. 

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol theft from bikes nashik marathi news