समाजाचे विविध पैलू फोटोने दाखवणाऱ्या 'छायाचित्रकाराने' परिस्थितीवर काढला मार्ग...सगळ्यांनाच केले अचंबित!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

"तिथे काय कमी'... "एक फोटो काढला की झालं' असा सर्वसाधारण दृष्टिकोन छायाचित्रकाराबाबत सर्वसाधारणाने असतो. त्यातही तो वृत्तपत्रासाठीचा छायाचित्रकार असेल, त्याला काय कमी, असा समज दृढच. प्रत्यक्षात तसे नाही. बहुधा तसे नसतेच. पण...

नाशिक / नांदगाव : "तिथे काय कमी'... "एक फोटो काढला की झालं' असा सर्वसाधारण दृष्टिकोन छायाचित्रकाराबाबत सर्वसाधारणाने असतो. त्यातही तो वृत्तपत्रासाठीचा छायाचित्रकार असेल, त्याला काय कमी, असा समज दृढच. प्रत्यक्षात तसे नाही. बहुधा तसे नसतेच.

...अन्‌ छायाचित्रकाराने सगळ्यांनाच केले अचंबित

कोरोनाच्या सध्या सुरू असलेल्या प्रकोपामुळे अनेकांच्या पुढे समस्या वाढल्या आहेत. त्याची झळ बहुतांशी छायाचित्रकारांना बसू लागली आहे. स्टुडिओ बंद असल्याने व लग्नसराई संपल्याने पुढे काय, अशा भेडसावणाऱ्या समस्येवर त्यांपैकी अनेक जण रोजच्या जगण्याच्या वाटा चोखंदळत आहेत. शहरातील वृत्तपत्रांसाठी गेली अनेक वर्षे फोटोग्राफी करणारे शंकर विसपुते यांनी चक्क भाजीपाला विक्री सुरू केल्याने त्यांना ओळखणारेही अचंबित झाले. वस्तुस्थिती वेगळी आहे.

हेही वाचा > थरारक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'

लॉकडाउनमुळे आलेल्या परिस्थितीवर मात 

लहानपणापासून कुल्फी विक्रीपासून पडेल ती कामे करणारे विसपुते यांची घरची परिस्थिती बेताचीच. मात्र, तिचा कधीही बाऊ केला नाही. आजही छोट्या खोलीत संसार चालविणारे शंकर विसपुते यांच्यासमोरही लॉकडाउनमुळे दैनंदिन जगण्याची समस्या उभी ठाकली. आलेल्या परिस्थितीतही त्यांनी मार्ग काढत दुचाकीवर भाजीपाला-फळविक्री सुरू करून आपल्या चरितार्थाचे साधन शोधले. अनेकांच्या दृष्टीने तो कौतुकाचा विषय बनला. विसपुते यांचे नवे रूप अनेकांना भावून गेले. सोशल मीडियावर दुचाकीवर भाजीपाला विक्री करणारा छायाचित्रकाराचाच फोटो अनेकांना हेलावून गेला.  

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: photographer started selling vegetables and fruits situation caused by the lockdown nashik marathi news