अमानुष! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भीतीपोटी वाच्यता न केल्याचा गंभीर परिणाम

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Wednesday, 19 August 2020

फेब्रुवारीत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती शाळेतून सायकलीवर घरी जात होती. अनोळख्या व्यक्तीने सायकलला धक्का दिल्याने ती खाली पडली. तोंडाला रुमाल बांधलेल्या व्यक्तीने विद्यार्थिनीस बाजूला नेऊन अतिप्रसंग केला.

नाशिक/ नाशिक रोड : देवळालीगावातील अल्पवयीन मुलीवर अनोळखी व्यक्तीने अतिप्रसंग केला. आई-वडिलांना सांगितले, तर ते शिक्षण बंद करतील, या भीतीमुळे तिने वाच्यता केली नाही. त्यानंतर..

असा घडला प्रकार

विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारीत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती शाळेतून सायकलीवर घरी जात होती. अनोळख्या व्यक्तीने सायकलला धक्का दिल्याने ती खाली पडली. तोंडाला रुमाल बांधलेल्या व्यक्तीने विद्यार्थिनीस बाजूला नेऊन अतिप्रसंग केला. आई-वडिलांना सांगितले, तर ते शिक्षण बंद करतील, या भीतीमुळे तिने वाच्यता केली नाही. 

हेही वाचा >दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

ती गरोदर असल्याचे उघड

दोन आठवड्यांनी रात्री आठच्या सुमारास ती घरी एकटी होती. आई-वडील बाहेर गेले होते. रात्री आठच्या सुमारास अनोळख्या व्यक्तीने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केला. वडील खूप रागीट असल्याने मुलीने कोणाला काही सांगितले नाही. ९ ऑगस्टला ती आई-वडिलांसह कन्नडच्या विठ्ठलपूर येथे मामाच्या घरी गेली. मुलीचे पाय व पोट खूप दुखत असल्याने दवाखान्यात नेण्यात आले, तेव्हा ती गरोदर असल्याचे उघड झाले. औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात तिला कन्यारत्न झाले. उपनगर पोलिसांत पॉक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन : रमेश चौधरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: physically abuse of a minor girl in Deolaligaon nashik marathi news