रामकुंडावर अरुणा नदी पाइपलाइनमधून आणण्याचा घाट घातल्याचा आरोप

 plan to bring aruna river at ramkund through pipeline
plan to bring aruna river at ramkund through pipeline

नाशिक:  नाशिकचा गोदा पार्क यापूर्वी अनेकदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे. वारंवार पुराखाली गेलेला गोदा पार्क नामशेष झालेला असताना पुन्हा नव्याने स्मार्टसिटींतर्गत पूररेषेतच सुमारे 68 कोटींची विकासकामे धरली जात आहेत. याशिवाय रामकुंड परिसरात गोदावरी-अरुणा संगमावर अरुणा नदी पाइपलाइनमधून आणण्याचे प्रस्तावित असल्याने त्याला पर्यावरणप्रेमींनी हरकत घेतली आहे.

नाशिकला 1969 च्या महापुरानंतर 2008, 2016 आणि 2019 ला महापूर आले. 2016 आणि 2019 च्या महापुरात गंगापूर धरणातून 45 हजार क्‍यूसेक पाण्याच्या विसर्गाने अहिल्यादेवी होळकर पुलाखालून 84 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. म्हणजे तब्बल 39 हजार क्‍यूसेक अतिरिक्त पाणी जमा होणाऱ्या होळकर पुलाबाबत अजूनही महापालिका यंत्रणा गंभीर नसल्याचे पुढे आले आहे. पुराचे गांभीर्य लक्षात न घेताच प्रशासनाने पुन्हा एकदा 68 कोटींची कामे याच पूररेषेत करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे भविष्यात पूर आला म्हणजे नागरिकांच्या कराचे हे 68 कोटी रुपये पाण्यातच जाण्याचा धोका आहे. कारण कोटींच्या प्रकल्प पाण्याखाली जाणार हे स्पष्ट दिसत असताना पूररेषेत 68 कोटींच्या कामांविरोधात जिल्ह्याचे पालक सचिव व स्मार्टसिटीचे अध्यक्ष सीताराम कुंटे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.

नदी पाइपलाइन मधून..
पुराच्या पाण्यात कोटींची कामे जाण्यापूर्वी पूर प्रभावक्षेत्रातील विकासकामांसाठी पर्यावरण विभागासह नीरी संस्थेची परवानगी आवश्‍यक आहे. घेतली असल्यास पूररेषेतील परवानगी/मान्यता लोकांसमोर परवानगी प्रसिद्ध करावी. तसेच ही कामे पुरात जाणार नाहीत, अशी हमी महापालिका यंत्रणेने द्यावी, अशी मागणी देवांग जानी यांनी केली आहे. नदीच पुन्हा पाइपलाइनमधून इंद्रकुंड ते रामकुंडापर्यंत अरुणा नदी नैसर्गिकरीत्या रामकुंडातील अरुणेच्या गोमुखात सोडावी, अशी निसर्गप्रेमींची मागणी आहे. मात्र महापालिकेच्या नियोजनात पुन्हा नाशिक स्मार्टसिटीच्या डीपीआर व प्रस्तावानुसार अरुणा नदी पाइपलाइनद्वारे रामकुंडात आण्यात येणार आहे. त्याला सक्त हरकत नोंदविली आहे.

पुराचा धोका वाढणार
मेकॅनिकल गेटसाठी 26 कोटी खर्च करून अहिल्यादेवी होळकर पुलाच्या 15 मीटर पुढे मेकॅनिकल गेट बसविले जाणार आहे. त्या गेटमुळे पुराची तीव्रता वाढणार की कमी होणार, हेही स्पष्ट नाही. जलसंपदा विभागाने सूचना केलेली आहे की अहिल्यादेवी होळकर पुलाखालील गेट हटवा. त्यामुळे आम्ही स्थानिक नागरिक साशंक आहोत. गोदावरी नदी ज्या भागात रौद्ररूप धारण करते, त्या भागात मेकॅनिकल गेट आकलनाच्या पलीकडे आहे. या संदर्भात पुनर्विचार करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली
आहे.

-स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रोजेक्‍ट गोदा रिव्हर फ्रंट एरिया गोदावरी रिव्हर फ्रंट आणि ब्यूटिफिकेशन प्रकल्पातील पहिला टप्पा रामवाडी पूल ते होळकर पुला (व्हिक्‍टोरिया पूल)पर्यंत 68 कोटींची विकासकामे सुरू झालेली आहेत. नाशिकच्या मंजूर डीपीआर 2017 प्रमाणे हा भूभाग पूररेषेत अर्थात ब्लू लाइन आणि रेड लाइनमध्ये आहे. स्मार्टसिटीच्या डीपीआरमध्येसुद्धा पूररेषा नमूद आहे. असे असतानाही ही कामे होत असल्याने या कामांना हरकत घेतली आहे.
-देवांग जानी, गोदाप्रेमी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com