esakal | बोगस लाभार्थ्यांनो सावधान! प्रधानमंत्री किसान सन्मान कडून वसुली सुरू; पहिल्याच दिवशी १६ हजारांची वसुली
sakal

बोलून बातमी शोधा

pm kisan yojna.jpg

केंद्राने दोन वर्षांपूर्वी किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेच्या अर्टी व शर्तीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा होत आहेत. तालुक्यात ५६ हजार लाभार्थी यासाठी पात्र ठरले. योजनेच्या पोर्टलवर मिळालेल्या माहितीवरून यातील एक हजार १२ लाभार्थी बोगस आहेत.

बोगस लाभार्थ्यांनो सावधान! प्रधानमंत्री किसान सन्मान कडून वसुली सुरू; पहिल्याच दिवशी १६ हजारांची वसुली

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या ५६ हजार शेतकऱ्यांपैकी तालुक्यातील एक हजार १२ बोगस लाभार्थी आढळले आहेत. यात शासकीय नोकरीत व प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. योजनेच्या पोर्टलवरून ही माहिती प्राप्त झाली. बोगस लाभार्थ्यांकडून वसुली सुरू झाली असून, एकूण ९५ लाख ३८ हजार एवढी वसुली करावयाची आहे. पहिल्याच दिवशी १६ हजार रुपयांची वसुली झाल्याचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले. 

प्रधानमंत्री किसान सन्मान बोगस लाभार्थ्यांकडून वसुली सुरू 

बोगस लाभार्थ्यांकडून लवकरात लवकर रक्कम वसूल करण्याचे आव्हान महसूल विभागासमोर आहे. बोगस लाभार्थ्यांनी रक्कम न भरल्यास लाभार्थ्यांच्या सातबारा उताऱ्यावर रकमेचा बोजा लावण्यात येईल. गाव नमुना नंबर ६, फेरफार रजिस्टर उतारा व सातबारासह याबाबत अहवाल सादर केला जाईल, असे राजपूत यांनी सांगितले. तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून तहसीलदारांवर वसुलीची जबाबदारी आहे. त्यांच्या नावे बँकेत खाते उघडले असून, स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

एक हजार १२ लाभार्थी बोगस 
केंद्राने दोन वर्षांपूर्वी किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेच्या अर्टी व शर्तीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा होत आहेत. तालुक्यात ५६ हजार लाभार्थी यासाठी पात्र ठरले. योजनेच्या पोर्टलवर मिळालेल्या माहितीवरून यातील एक हजार १२ लाभार्थी बोगस आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यावरील ९५ लाख ३८ हजार रुपये वसूल करावयाचे आहेत. संबंधित तलाठ्यांना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. 

हेही वाचा > पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार