भाऊची विनाक्रमांकाच्या बाईकची बिनधास्त राईड..! अशी पडली भारी की...सगळा रूबाबच उतरला..!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

विनाक्रमांकाची दुचाकी घेऊन तो गावात रुबाबात फिरत होता. सगळ्यांनाच तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर असे काही घडले की अचानक पोपटासारखा बोलु लागला.. त्याने जे काही सांगितले ते ऐकुन पोलीसांनाही धक्का बसला......

नाशिक / मालेगाव : विनाक्रमांकाची दुचाकी घेऊन तो गावात रुबाबात फिरत होता. सगळ्यांनाच तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर असे काही घडले की अचानक पोपटासारखा बोलु लागला.. त्याने जे काही सांगितले ते ऐकुन पोलीसांनाही धक्का बसला......

भाऊचा रूबाबच उतरला...

शहरातील साठफुटी रस्त्यावर विनाक्रमांकाची दुचाकी घेऊन तो गावात रुबाबात फिरत होता. ते एका पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले.त्याने दुचाकीधारकाला हटकले.. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.पोलीसी खाक्‍या दाखवताच तो पोपटासारखा बोलु लागला त्याने जे काही सांगितले ते ऐकुन पोलीसांनाही धक्का बसला.. त्याने आठ दुचाकी चोरीची कबुली दिली. टिल्लु गुरव उर्फ मणेश दत्तात्रय शिंदे (वय-44, रा. रावळगाव, ता. मालेगाव) याला छावणी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून सुमारे दोन लाख 15 हजार रुपये किंमतीच्या होंडा कंपनीच्या विविध आठ दुचाकी जप्त करण्यात आल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांनी बुधवारी (ता.1) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

टिल्लू हा तर सराईत चोरटा

टिल्लू उर्फ मणेश हा सराईत दुचाकी चोरटा आहे. यापुर्वीही त्याच्याविरुध्द जायखेडा, वडनेर पोलिस ठाण्यात 2016 मध्ये चार गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला एक वर्षासाठी 2017 मध्ये हद्दपार करण्यात आले होते. यानंतर तो परतताच त्याने पुन्हा दुचाकी चोरीला सुरवात केली.शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेल्या काही दिवसात दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. छावणी पोलिसांना दुचाकी चोरट्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक आरती सिंह, श्री. घुगे, उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण वाडिले,रविराज गवंडी, नितीन बारहाते, संजय पाटील, संदिप राठोड, वासुदेव नेरपगार, महेंद्र पवार आदींनी सापळा रचून टिल्लू उर्फ मंगेशला 27 जूनला रात्री ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार, तालुका, वडनेर खाकुर्डी, किल्ला व कॅम्प अशा विविध पाच पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून या आठ दुचाकी चोरी केल्या होत्या.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

मास्टर की च्या साहाय्याने दुचाकी चोरीचा फंडा

मास्टर कीच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरी करण्याची त्याची पध्दत होती. इंडियन ब्युटीक, मारुती मंदिर संगमेश्वर, छत्रपती महाराज शिवाजी पुतळा, इंदिरानगर, दाभाडी, चाळीसगाव चौफुली, मनमाड चौफली, वडनेर खाकुर्डी हद्दीतील साई सिलेब्रेशन लॉन्स व कॅम्प हद्दीतील चिंतामणी लॉन्स येथून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. क्रमांक बदलवून किंवा विना क्रमांकाच्या व विना कागदपत्राच्या दुचाकी त्याने विक्री केल्याचे समजते.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police action against Unnumbered two-wheeler ride nashik marathi news