कोरोनाची पोलीसांना मगरमिठी.. क्वारंटाईन होऊन बरे झालेही...तरीही पॉझिटिव्ह!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

नाशिकमध्ये समाज कल्याण वसतिगृहात चौदा दिवस क्वारंटाईन होते. 25 जूनला ते बरे होऊन अभोणा येथे परतले.मात्र, दुसऱ्यादिवशी (ता. 26) पुन्हा त्रास जाणवू लागल्याने, त्यांनी स्वतःहून कळवण येथील जिल्हा उपरुग्णालयात जाऊन तपासणी केली

नाशिक / अभोणा : नाशिकमध्ये समाज कल्याण वसतिगृहात चौदा दिवस क्वारंटाईन होते. 25 जूनला ते बरे होऊन अभोणा येथे परतले.मात्र, दुसऱ्यादिवशी (ता. 26) पुन्हा त्रास जाणवू लागल्याने, त्यांनी स्वतःहून कळवण येथील जिल्हा उपरुग्णालयात जाऊन तपासणी केली

चौदा दिवस क्वारंटाईन

अभोणा येथील रहिवासी व मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले असताना कोरोनाबाधित झालेल्या व चौदा दिवसानंतर बरे झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल शनिवारी पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. संबंधीत पोलीस कर्मचारी हे 1 मे ते 11 जूनपर्यंत मालेगाव शहरात बंदोबस्तासाठी तैनात होते. दरम्यानच्या काळात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता, अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून 25 जूनपर्यंत ते नाशिकमध्ये समाज कल्याण वसतिगृहात चौदा दिवस क्वारंटाईन होते. 25 जूनला ते बरे होऊन अभोणा येथे परतले.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

पुन्हा पॉझिटिव्ह

मात्र, दुसऱ्यादिवशी (ता. 26) पुन्हा त्रास जाणवू लागल्याने, त्यांनी स्वतःहून कळवण येथील जिल्हा उपरुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वॅब तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल शनिवारी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने त्यांना मानूर येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आल्याचे कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे यांनी सांगितले.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police again and again positive