VIDEO : किती वेळा सांगायच? शेवटी खाल्लाच 'त्यांनी' पोलीसांच्या दंडुक्याचा प्रसाद!

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात संचारबंदी लागु करण्यात आली असून मुख्य रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संचारबंदी असूनही काही उतावीळ तरुणांकडून मोकळ्या रस्त्यांवरचे दृश्‍य पाहण्यासाठी गर्दी केली जात असल्याने अखेर पोलिसांना त्यांचा खाक्‍या दाखविण्याची वेळ आली. 

नाशिक / नामपूर  : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू असतानाही नामपूर शहरात मध्यवर्ती बसस्थानक, पेट्रोलपंप, शिवमनगर परिसरात विनाकारण रस्त्यावर गर्दी करणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलिसांनी आता बळाचा वापर करून सक्तीने कारवाई सुरू केली आहे. जीवनावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतरही नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. विशेषतः काही तरूण गाड्या घेवून फिरत असल्याने पोलिसांनी त्यांना खाकीचा प्रसाद दिला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच बसावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक स्वप्नील कोळी यांनी केले आहे. 
 

अखेर पोलिसांना त्यांचा खाक्‍या दाखविण्याची वेळ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात संचारबंदी लागु करण्यात आली असून मुख्य रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संचारबंदी असूनही काही उतावीळ तरुणांकडून मोकळ्या रस्त्यांवरचे दृश्‍य पाहण्यासाठी गर्दी केली जात असल्याने अखेर पोलिसांना त्यांचा खाक्‍या दाखविण्याची वेळ आली. 

#COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल

रस्त्यांवर वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांना दंडुका उगारावा लागला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रविवार संपुर्ण दिवस बंद पाळण्याचे आवाहन केले. नागरिकांनी कडकडीत बंद पाळला देखील त्यानंतर राज्य शासनाने जमावबंदीचा कलम 144 लागु केला. परंतू काही झालेचं नाही या अविर्भावात अनेक नागरिक (ता.२४) घराबाहेर पडले. पोलिसांनी विनंती करूनही गर्दी थांबण्याचे नाव घेत नव्हती, शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांना दंडुका उगारावा लागला. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police beaten to people were leaving home while ban due to corona Nashik Marathi News